"शरद मोहोळचा गेम केला आहे..." पहिला फोन केंद्र सरकारच्या एका संस्थेतील कर्मचाऱ्याला

By नम्रता फडणीस | Published: January 13, 2024 06:11 PM2024-01-13T18:11:36+5:302024-01-13T18:12:33+5:30

गुंड शरद मोहोळ याचा खून प्रकरणात गुन्हे शाखेने आणखी तीन जणांना अटक केली असून त्यांना शनिवारी न्यायालायत हजर करण्यात आले होते....

Sharad Mohol game has been played..." The first phone call was to an employee of a central government organization | "शरद मोहोळचा गेम केला आहे..." पहिला फोन केंद्र सरकारच्या एका संस्थेतील कर्मचाऱ्याला

"शरद मोहोळचा गेम केला आहे..." पहिला फोन केंद्र सरकारच्या एका संस्थेतील कर्मचाऱ्याला

पुणे : आरोपीने पहिले सिमकार्ड काढून नवीन सिम कार्ड मोबाईल मध्ये टाकले आणि पहिला फोन केंद्र सरकारच्या एका संस्थेतील कर्मचारी संतोष कुरपेला केला. त्याला सांगितले की, शरद मोहोळचा गेम केला असून ही गोष्ट मास्टर माईंडला सांगा, अशी माहिती तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील तांबे यांनी न्यायालयात दिली.

गुंड शरद मोहोळ याचा खून प्रकरणात गुन्हे शाखेने आणखी तीन जणांना अटक केली असून त्यांना शनिवारी न्यायालायत हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्यांना १७ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. नितीन अनंता खैरे (वय - ३४, रा. गादी स्टेट, कोथरूड), आदित्य विजय गोळे (वय २४) आणि संतोष दामोदर कुरपे (रा. कोथरूड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नावे आहेत. संतोष कुरपे हा ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (एआरएआय) या केंद्र सरकाराच्या संस्थेत ऑफिस असिस्टंट या पदावर आहेत. आतापर्यंत या प्रकरणात १३ जणांना अटक करण्यात आली आहे. तर दोन वकील आरोपींची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.

यावेळी तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील तांबे यांनी न्यायालयात सांगितले की, मोहोळचा खून करण्यापूर्वी मुन्ना पोळेकर आणि त्याच्या साथीदारांनी हडशी गावात गोळीबाराचा सराव केला होता. त्यावेळी आरोपी नितीन खैरे आणि आदित्य गोळे हे सहभागी झाले होते. तसेच खैरे आणि गोळे यांनी आरोपीला शस्त्र खरेदीसाठी आर्थिक मदत केली आहे. तसेच खुनाच्या कटात त्याचा सहभाग आहे. त्याने इतर आरोपींकडून तयारी करून घेतली. खैरे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. तसेच मोहोळचा खून होण्यापूर्वी आरोपींची मिटिंग झाली होती त्याला आरोपी आदित्य गोळे उपस्थित होते.  

मोहोळचा खून केल्यानंतर मुन्ना पोळेकरसह इतर आरोपी हे कोल्हापूरच्या दिशेने पळून जात होते. यावेळी खेड शिवापूर टोल नाक्याच्या पुढे हे आरोपी थांबले. त्यावेळी आरोपींना त्यांचे नातेवाईक भेटायला आले होते. त्यावेळी आरोपीला एक नवीन सिम कार्ड देण्यात आले. आरोपीने पहिले सिमकार्ड काढून नवीन सिम कार्ड मोबाईल मध्ये टाकले आणि पहिला फोन संतोष कुरपेला केला.

मोहोळचा खून करण्यासाठी ४ पिस्टल आणण्यात आले होते. त्यातील ३ पिस्टल जप्त करण्यात आले आहे. यातील १ पिस्टल संदर्भातील माहिती खैरे आणि गोळे याला आहे. हडशी येथे गोळीबाराचा सराव केला होता त्यावेळी अजून काही आरोपी उपस्थित होते. मुन्ना पोळेकर आणि इतर आरोपीचा सोबत तपास करायचा असल्याने ५ दिवसांची पोलीस कोठडीची मागणी तांबे यांनी केली होती. त्याला विरोध करतांना आरोपीच्या वतीने लोक अभिरक्षक कार्यालच्या वतीने मयूर दोडके यांनी बाजू मांडली. यावेळी ऍड दोडके यांनी न्यायालयात सांगितले की, संतोष कुरपे यांना अनोळखी क्रमांकावरून फोन आल्याने उचलला. पलीकडून शरद मोहोळचा गेम केला असून मास्टरला सांगा असे सांगितले.  न्यायालयाने दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून आरोपीना १७ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Web Title: Sharad Mohol game has been played..." The first phone call was to an employee of a central government organization

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.