नराधम पित्याचे लज्जास्पद कृत्य; स्वतःच्याच १५ वर्षीय मुलीचा केला लैंगिक छळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2021 15:52 IST2021-12-26T15:52:07+5:302021-12-26T15:52:16+5:30

मुलीच्या आईने याप्रकरणी पोलिसांत तक्रार केली आहे.

the shameful act of father in pimpri he sexually abused his own 15 year old daughter | नराधम पित्याचे लज्जास्पद कृत्य; स्वतःच्याच १५ वर्षीय मुलीचा केला लैंगिक छळ

नराधम पित्याचे लज्जास्पद कृत्य; स्वतःच्याच १५ वर्षीय मुलीचा केला लैंगिक छळ

पिंपरी : पित्यानेच अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी नराधम पित्याला अटक करण्यात आले. वाल्हेकरवाडी येथे ९ ते २४ डिसेंबर या कालावधीत हा प्रकार घडला. याप्रकरणी पीडित १५ वर्षीय मुलीच्या आईने चिंचवड पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि. २४) चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी ४३ वर्षीय पित्याला अटक केली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा मजुरी काम करतो. त्याने त्याच्या पोटच्या १५ वर्षीय मुलीचा लैंगिक छळ केला. मुलीने आईला हा प्रकार सांगितला. त्यानंतर तिच्या आईने पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

Web Title: the shameful act of father in pimpri he sexually abused his own 15 year old daughter