लज्जास्पद! अल्पवयीन मुलावर "दोन अल्पवयीन मुलांकडूनच" अत्याचार; धमकी देत उकळले पावणे २ लाख
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2021 13:16 IST2021-07-09T13:15:22+5:302021-07-09T13:16:01+5:30
सहकारनगर पोलीस ठाण्यात दोन अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल

लज्जास्पद! अल्पवयीन मुलावर "दोन अल्पवयीन मुलांकडूनच" अत्याचार; धमकी देत उकळले पावणे २ लाख
धनकवडी: पंधरा वर्षाच्या मुलासोबत अनैसर्गिक कृत्य केल्याबद्दल दोन अल्पवयीन मुलांवर सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलाचे आई वडिल घराबाहेर गेल्यावर त्याच्यावर अत्याचार करण्यात येत होते. याचे चित्रीकरण व्हायरल करण्याची धमकी देत पिडीत मुलाकडून पावणे दोन लाख रुपये उकळण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, पिडीत मुलगा व दोन्ही मुले एका नामांकित ज्युनिअर कॉलेज व हायस्कूलमध्ये शिक्षण घेतात. राहायला तीघेही जवळपास आहेत. आरोपी मुलांनी एकदा ब्लू फिल्म बघितली होती. यानंतर त्यांनी पिडीत मुलावर अत्याचार करत त्याचे चित्रीकरण केले होते.
हा प्रकार नोव्हेंबर २०२० मध्ये घडला होता. यानंतर दोघाही आरोपींनी पिडीत मुलाची काढलेली नग्न छायाचित्रे त्याला दाखवत धमकी दिली. ही छायाचित्रे इतरांना दाखवण्याची धमकी देत त्याच्याकडून वेळो वेळी एक लाख ७२ हजार रुपये घेतले. पिडीत मुलाने घरातील पैसे व दागिने चोरुन त्यांना ही रक्कम दिली. पिडीत मुलाच्या वडिलांना घरात ठेवलेले पैसे व दागिने जागेवर नसल्याचे लक्षात आले. त्यांनी मुलाकडे विचारपूस केली असता, त्याने हा प्रकार सांगितला. याप्रकरणाचा तपास सहकारनगर पोलीस करत आहेत.