शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

सातासमुद्रापलीकडून मदतीची ‘शाबासकी’

By admin | Updated: March 17, 2015 00:26 IST

घरची परिस्थिती हलाखीची... भंगार जमा करून त्यातून मिळणाऱ्या पैशांतून कुटुंबाची गुजराण करणेही मुश्कील... त्यातच पत्नीला असाध्य आजार जडला... पैसे नसल्याने उपचार घेणे शक्य नव्हते...

पुणे : घरची परिस्थिती हलाखीची... भंगार जमा करून त्यातून मिळणाऱ्या पैशांतून कुटुंबाची गुजराण करणेही मुश्कील... त्यातच पत्नीला असाध्य आजार जडला... पैसे नसल्याने उपचार घेणे शक्य नव्हते... अशातच भंगार गोळा करताना त्यात कोट्यवधी रुपयांचे सोने सापडल्यानंतर त्याचा मोह न बाळगता ते संबंधित व्यक्तीला परत करणारा प्रामाणिक भंगार विक्रेता... अशा प्रामाणिकतेची महती सोशल मीडियावरून कळताच सातासमुद्रापलीकडून उपचारासाठी आर्थिक मदतीच्या रूपात मिळालेला मदतीचा हात... ही कोणती कहाणी नसून सुभाष वडावराव यांच्यासोबत घडलेली घटना आहे.शिवाजीनगर झोपडपट्टी येथे राहणारे सुभाष हे दररोज भंगार जमा करून त्याच्या विक्रीतून मिळणाऱ्या पैशातून घर चालवितात. त्यामुळे घरात अठराविश्वे दारिद्रय. अशातच त्यांच्या पत्नी शोभा यांना लठ्ठपणा आणि मधुमेहाचा आजार जडला आणि त्यांना घराबाहेर पडणेही मुश्किल झालले. मात्र पैसे नसल्याने त्यांच्यावर उपचार करणे सुभाष यांना शक्य होत नव्हते. अशातच एके दिवशी भंगार जमा करताना त्यांना कोट्यवधी रुपयांचे सोने सापडले. हे सोने विकून त्यातून मिळणाऱ्या पैशांनी पत्नीचे उपचार आणि चांगले जीवन जगता येईल, याचा विचार न करता सुभाष यांनी संबंधित सोने कोणत्या व्यक्तीचे आहे त्याला ते परत केले. मात्र त्या व्यक्तीने या प्रामाणिकतेचा मोबदला म्हणून काही पैसे सुभाष यांच्या हातात टेकविले. अशातच सुभाष यांच्या प्रामाणिकतेची ही घटना सोशल मीडियावरून सगळीकडे पसरली आणि ती अमेरिकेतील एम. के. वालिया यांना कळाली. त्यांनी लगेचच तेथून सुभाष यांना आर्थिक मदत देऊ केली. त्यातून सुभाष यांनी पत्नीवर उपचार करण्याचा निर्णय घेतला. लॅप्रो ओबेसो सेंटरचे संचालक व बॅरिअट्रिक सर्जन डॉ. शशांक शहा यांनी त्यांच्यावर बॅरिअट्रिक शस्त्रक्रिया केली. त्यातून शोभा यांचे दहा किलो वजन कमी झाले आणि मधुमेहही आटोक्यात आला. मात्र त्यानंंतर पुढील उपचार आणि औषधांसाठी पैसे नसल्याने डॉ. शहा यांनी ओबेसिटी अ‍ॅन्ड डायबेटिस फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून मदतीचा हात पुढे केला आणि शोभा व सुभाष वडावराव यांचे जीवनच पालटले. (प्रतिनिधी)शस्त्रक्रियेपूर्वी पाय सुजले होते. मधुमेह झाल्याचे कळाले होते. मात्र त्यावर उपचारासाठी पैसेच आमच्याकडे नव्हते. अशातच आम्हाला प्रामाणिकतेमुळे मदत मिळाली आणि त्यातून माझ्यावर चांगले उपचार झाले आणि मी आजारातून मुक्त होण्याच्या मार्गावर पोहोचले आहे.- शोभा वडावराव