पोटच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करत केले लैंगिक चाळे; पुणे जिल्ह्यातील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2022 02:22 PM2022-04-14T14:22:43+5:302022-04-14T14:24:49+5:30

अंगावरील गोधडी ओढून घेत केले लैंगिक चाळे...

sexually abusing underage girl shocking incident in baramati pune district crime news | पोटच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करत केले लैंगिक चाळे; पुणे जिल्ह्यातील धक्कादायक घटना

पोटच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करत केले लैंगिक चाळे; पुणे जिल्ह्यातील धक्कादायक घटना

googlenewsNext

बारामती (पुणे) : मुढाळे (ता.बारामती) येथे पोटच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करत तिच्याशी लैंगिक चाळे करणाऱ्या नराधम बापाला वडगाव निंबाळकर पोलिसांनी गजाआड केले आहे. माणुसकीला शरम आणणारी घटना घडल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत मुलीनेच याबाबत वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ऑक्टोबर २०२१ ते ६ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत घरामध्ये ही घटना घडली. फिर्यादी मुलगी ही घरात अभ्यास करत बसली असताना तिच्या पित्याने तेथे येत तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करीत तिचा विनयभंग केला. मुलीने हा प्रकार आईला सांगेन असे म्हणत त्याला विरोध केला. त्यावर त्याने तिला जीवे मारून टाकण्याची धमकी दिली.

६ नोव्हेंबर रोजी सकाळी ७.३० वाजता फिर्यादी मुलगी घरात झोपली होती. यावेळी नराधम पित्याने तेथे येत तिच्या अंगावरील गोधडी ओढून घेत तिच्याशी लैंगिक चाळे केले. यावेळी मुलगी ओरडल्याने तो दुसऱ्या खोलीत निघून गेला. त्याच दिवशी पित्याने दारु पिवून येत पुन्हा तिच्याशी चाळे करत तिचा विनयभंग केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आली आहे. 

त्यानंतर फिर्यादी  मुलगी साखरवाडी (ता. फलटण) येथे मामाकडे राहण्यास गेली होती. ४ फेब्रुवारी २०२२ रोजी फिर्यादीच्या आईला आरोपीने मारहाण केली. त्यामुळे ती सुद्धा माहेरी निघून गेली. यावेळी तेथे अगोदरपासूनच राहत असलेल्या मुलीने आईसह मामाला आपल्यावर ओढवलेला प्रसंग सांगितला. त्यानंतर त्या दोघींनी पोलिस ठाण्यात येत फिर्याद दाखल केली.

पोलिसांनी ४३ वर्षीय नराधम पित्यावर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. त्याला बुधवारी (दि. १३) रोजी बारामती न्यायालयासमोर हजर करण्यात आले. यावेळी सरकारी वकील अ‍ॅड. स्नेहल नाईक यांनी नराधम पित्याला अधिकाधिक पोलिस कोठडी द्यावी अशी मागणी केली. न्यायालयाने १६ तारखेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

Web Title: sexually abusing underage girl shocking incident in baramati pune district crime news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.