लोणी काळभोर येथे मोबाईल देण्याच्या बहाण्याने लैंगिक अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2018 19:11 IST2018-09-24T19:11:05+5:302018-09-24T19:11:58+5:30

मोबाईल खेळण्यासाठी देण्याच्या बहाण्याने ४ वर्षे वयाच्या लहान बालकावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना लोणी स्टेशन परिसरात घडली असून, हा प्रकार उघडकीस आल्यानंतर परप्रांतीय आरोपी फरार झाला आहे. 

Sexual harasshment of child by giving mobile at Loni Kalbhor | लोणी काळभोर येथे मोबाईल देण्याच्या बहाण्याने लैंगिक अत्याचार

लोणी काळभोर येथे मोबाईल देण्याच्या बहाण्याने लैंगिक अत्याचार

ठळक मुद्देमुलाला उपचारासाठी रूग्णालयात दाखल

लोणी काळभोर : मोबाईल खेळण्यासाठी देण्याच्या बहाण्याने ४ वर्षे वयाच्या लहान बालकावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना लोणी स्टेशन परिसरात घडली असून, हा प्रकार उघडकीस आल्यानंतर परप्रांतीय आरोपी फरार झाला आहे. 
पीडित मुलाच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून साजन ऊर्फ अमरीश दास (सध्या रा. खैरेवस्ती, कदमवाकवस्ती, मूळ रा. बिहार) याच्यावर बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार : पीडित मुलगा आईवडील, मोठा भाऊ व आजीसमवेत राहतो. २२ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास हा मुलगा त्यांच्या बिल्डिंगमध्ये तिसºया मजल्यावर राहत असलेल्या दास याच्याकडे खेळण्यासाठी गेला होता. 
साधारण अर्ध्या तासाने तो रडत घरी आला. त्या वेळी त्याला आई व आजीने रडण्याचे कारण विचारले असता त्याने साजन भय्या याने मोबाईल खेळण्यासाठी दिला. त्यानंतर लहान बालकावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केले. आरोपीकडे चौकशी केली असता तो पळून गेला. त्यानंतर मुलाला उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले. 

Web Title: Sexual harasshment of child by giving mobile at Loni Kalbhor