Pune Crime: पुण्यात जिवे मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर लैगिंक अत्याचार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2022 19:09 IST2022-10-01T19:08:19+5:302022-10-01T19:09:31+5:30
१७ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर वारंवार वेगवेगळ्या ठिकाणी देऊन अत्याचार...

Pune Crime: पुण्यात जिवे मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर लैगिंक अत्याचार
धायरी (पुणे) : तु माझ्याशी शारिरीक संबंध ठेवले नाही तर तुला व तुझ्या आईला जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी देऊन १७ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर वारंवार वेगवेगळ्या ठिकाणी देऊन अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एका १७ वर्षाच्या मुलीने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी रघुवीर लक्ष्मण राठोड (वय ३६, रा. जांभुळवाडी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार मार्च २०२१ पासून सुरु होता.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार अल्पवयीन मुलगी आणि आरोपी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. रघुवीर राठोड हा मार्च २०२१ मध्ये त्यांच्या घरी आला व त्याने या अल्पवयीन मुलीला तु माझ्याशी शारीरीक संबंध ठेवले नाही तर तुला व तुझ्या आईला जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी दिली. तसेच तिच्यावर जबरदस्तीने शारीरीक संबंध ठेवले.
त्यानंतर त्याने वेळोवेळी तिला वेगवेगळ्या लॉजमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला. त्याच्या धमकीमुळे तिने आजवर तक्रार दिली नव्हती. त्याच्याकडून होणार्या वांरवार अत्याचाराला कंटाळून तिने पोलिसांकडे तक्रार दिली असून पुढील तपास सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक अस्मिता लाड तपास करीत आहेत.