इंदापुर तालुक्यातील शेळगाव येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; दोन जणांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 14:26 IST2020-04-17T14:25:30+5:302020-04-17T14:26:06+5:30
अल्पवयीन मुलीला धमकी देत पळवुन नेऊन तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले.

इंदापुर तालुक्यातील शेळगाव येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; दोन जणांना अटक
इंदापूर : शेळगाव (ता. इंदापुर )येथील अल्पवयीन मुलीला धमकी देत पळवुन नेऊन तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे .याप्रकरणी दोन जणांवर वालचंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडीत मुलीच्या आईने याबाबत फिर्याद दिली आहे. याप्रकरणी म्हसु रामा शिंदे व राहुल रावसाहेब निबांळकर(दोघेही रा. डोर्लेवाडी ता. बारामती )यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींंनी गेल्या चार महिन्यांपासून शेळगाव तसेच सासवड जवळ डोंगर भागात पीडित मुलीबरोबर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले आहेत. तसेच गुरुवारी (दि १६) पीडित मुलीचे तोंड दाबुन जबरदस्तीने दुचाकीवरून तिला पळवुन नेले.
पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सदाशिव जगताप हे करत आहेत .गुन्ह्यातील दोन्ही आरोपींना तत्काळ अटक करण्यात आली आहे.