Sexual abuse of another girl in Pimpri: the fifth case in a month | पिंपरीत चार वर्ष वर्षाच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार
पिंपरीत चार वर्ष वर्षाच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार

पिंपरी: एका तोंडओळखीच्या व्यक्तीने बालिकेच्या घरात घुसून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. ही घटना पिंपरी येथे घडली. गेल्या महिनाभराच्या कालावधीत पाच बालिकांवर लैंगिक अत्याचाराच्या घटना समोर आल्याने पालकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हेमंत कृष्णा तांडेल (वय 35, रा.पिंपरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत 26 वर्षीय महिलेने गुरूवारी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 ऑगस्ट रोजी दुपारी बारा ते साडेबारा वाजताच्या दरम्यान आरोपी तांडेल याने फिर्यादीच्या घरात जाऊन फिर्यादीच्या चार वर्ष 11 महिन्याच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार केला. ही बाब लक्षात येताच तिच्या आईने पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली. पोलीस उपनिरीक्षक उत्कर्षा देशमुख याबाबत अधिक तपास करीत आहेत. गेल्या महिन्याभराच्या कालावधीमध्ये भोसरी येथे तीन पिंपळे सौदागर आणि पिंपरी येथे प्रत्येकी एका बालिकेवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


Web Title: Sexual abuse of another girl in Pimpri: the fifth case in a month
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.