Maharashtra | राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारसोबत सेक्सटॉर्शन; नेमकं प्रकरण काय आहे वाचा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2023 19:09 IST2023-02-10T19:04:16+5:302023-02-10T19:09:52+5:30
सेक्सटॉर्शनमुळे अनेकांनी आत्महत्या केल्या आहेत...

Maharashtra | राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारसोबत सेक्सटॉर्शन; नेमकं प्रकरण काय आहे वाचा...
पुणे : गेल्या काही महिन्यांपासून देशभरासह राज्यात सेक्सटॉर्शनचे अनेक प्रकार समोर येत आहेत.सुरूवातीला एखाद्या नवीन नंबवरवरून फोन किंवा मेसेज येतो.त्यानंतर चॅटींग केली जाते. नंतर अचानक व्हिडिओ कॉल येतो आणि समोर अश्लील चित्रफित दाखवण्यात येते.काही वेळाने तुमच्या व्हिडिओ कॉलचे स्क्रिनशॉट टाकून तुम्हाला धमकावून पैसे मागितले जातात.अनेक जण घाबरून पैसे देतात.पुन्हा वारंवार पैशांची मागणी होते.अखेर सेक्सटॉर्शनला बळी पडलेला व्यक्ती एकतर पोलिसांकडे जातो किंवा स्वतःला संपवून घेतो.सेक्सटॉर्शनमुळे अनेकांनी आत्महत्या केल्या आहेत.असाच एक प्रकार राष्ट्रवादीचे मोहोळच्या आमदारासोबत घडला.
सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार यशवंत माने यांच्यासोबतही सेक्सटॉर्शन प्रकार घडला. सायबर चोरट्याने सोशल मीडियावरुन माने यांचा नंबर शोधला आणि त्यांना सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात ओढले.जानेवारी महिन्यात माने यांच्या मोबाईल नंबरवर एक अश्लील मेसेज आला आणि अश्लील व्हिडिओ कॉल करून त्यांना भुरळ पाडण्याचा प्रयत्न केला. व्हिडिओ कॉल रेकॉर्ड करून सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल करू अशी धमकी त्यांना आली तसेच १ लाख रुपयांची खंडणी मागितली.
राजस्थानातून आरोपीला घेतले ताब्यात-
या प्रकरणाबद्दल यशवंत माने यांच्याशी संपर्क साधले असता ते म्हणाले, "मी कुठल्याही व्यक्तीशी बोललो नाही. तसेच मला लागोपाठ ७०-८० मेसेज करण्यात आले होते. १ लाख रुपयांची खंडणी मला मागितली होती यामुळे ही तक्रार सायबर पोलिस ठाण्यात दाखल केली होती,". आमदार माने हे पुण्यात वास्तव्यास असून त्यांनी पुण्यातील सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी मोबाईल क्रमांक तपासला असता तो राजस्थानमधील असल्याचे निदर्शनास आले. नंतर पोलिसांनी त्या ठिकाणी पथक पाठवले. पुणे पोलिसांच्या सायबर पोलिसांनी राजस्थान मधील भरतपूर या जिल्ह्यात ७ दिवसांसाठी तळ ठोकले आणि या आरोपीला पकडण्यात त्यांना यश आले.
रिझवान खान (२४) असे आरोपीचे नाव असून तो राजस्थान मधील आहे. आरोपी खान याने आत्तापर्यंत ८० जणांना असे फोन केले आहेत हे तपासातून निष्पन्न झाले असून त्याच्याकडून आत्तापर्यंत ४ मोबाईल जप्त करण्यात आले आहे.