Baramati: बारामतीत सेक्स रॅकेट उघड, पोलिसांनी दोन महिलांची केली सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2021 17:58 IST2021-11-20T17:45:53+5:302021-11-20T17:58:55+5:30

गणेश मार्केट जवळील एका सराफाच्या दुकानासमोर थांबून तीन महिला वेश्या व्यवसाय करत होत्या. परिसरातील नागरिकांनी या प्रकरणी तक्रार केली होती...

sex racket baramati police release two women | Baramati: बारामतीत सेक्स रॅकेट उघड, पोलिसांनी दोन महिलांची केली सुटका

Baramati: बारामतीत सेक्स रॅकेट उघड, पोलिसांनी दोन महिलांची केली सुटका

बारामती: नागरिकांनी केलेल्या तक्रारीवरुन बारामती शहरातील गणेश मार्केट भाजी मंडई परिसरात सुरु असलेला वेश्या व्यवसाय पोलिसांनी छापा टाकत उघड केला आहे. यावेळी शहर पोलिसांनी दोन महिलांची सुटका केली आहे. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील गणेश मार्केट भाजी मंडई, गुणवडी चौक परिसरात या महिला वेश्या व्यवसाय करत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक सुनील महाडिक यांना मिळाली होती. त्यानुसार शुक्रवारी (दि. १९) रात्री दहाच्या सुमारास महाडिक यांच्यासह उपनिरीक्षक गणेश पाटील, युवराज घोडके, सहाय्यक फौजदार संजय जगदाळे, हवालदार रामचंद्र शिंदे, अभिजित कांबळे, दशरथ कोळेकर, कल्याण खांडेकर, तुषार चव्हाण, बंडू कोठे, सचिन कोकणे, दशरथ इंगोले, मनोज पवार, संध्या कांबळे यांनी कारवाई केली.

गणेश मार्केट जवळील एका सराफाच्या दुकानासमोर थांबून तीन महिला वेश्या व्यवसाय करत होत्या. परिसरातील नागरिकांनी या प्रकरणी तक्रार केली होती. त्यानुसार त्यांनी तिघे पंच तयार करत तेथे छापा टाकला. बनावट ग्राहकाकडे पाचशे रुपये देवून त्याला पाठविण्यात आले. त्याने तेथे उभ्या असलेल्या महिलेकडे जात तिला पैसे दिल्यानंतर साध्या वेषातील पोलिसांना इशारा केला. पोलिसांनी लागलीच तेथे धाड टाकत एका महिलेला ताब्यात घेण्यात आले. ती मूळची एरंडोल (जि. जळगाव) येथील आहे. तिच्यासोबत बारामतीतील आणखी एक महिला आढळून आली. तिनेही कसब्यातील लेंडीपट्टा येथे राहणाऱ्या एजंट महिला कमिशनपोटी हा व्यवसाय करून घेत असल्याचे सांगितले.

पोलिसांनी दोन महिलांची सुटका करत एजंट महिलेला अटक केली. त्यांच्याकडून मोबाईल व रोख रक्कम जप्त करण्यात आली. तिच्याविरोधात अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. दोन महिलांकडून ती या ठिकाणी वेश्या व्यवसाय करून घेत होती. या दोन महिलांची पोलिसांनी सुटका केली.

Web Title: sex racket baramati police release two women