शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
2
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
3
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
4
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
5
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
6
इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
7
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
8
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
9
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
10
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
11
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
12
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
13
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
14
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
15
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
16
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
17
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
18
“अरविंद केजरीवाल कार्यालयात महात्मा गांधींची प्रतिमा का लावत नाहीत”; काँग्रेसचा थेट सवाल
19
Harsha Richhariya : "एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान
20
"माझी मुलं श्रेयस अय्यरला हाक मारताना..."; प्रिती झिंटाने IPLच्या 'सरपंच'बद्दल केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

सोमवारी मुख्यमंत्र्यांसह सात मंत्री पोलादपूरमध्ये उपस्थित राहणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2020 05:38 IST

तानाजी मालुसरे यांचा ३५०वा शौर्य दिन : ४५० अधिकारी तैनात

पोलादपूर : नरवीर तानाजी मालुसरे यांच्या ३५०वा शौर्य दिन व पुण्यतिथीनिमित्त १७ फेब्रुवारी रोजी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह मंत्रिमंडळातील सात मंत्री उपस्थित राहणार आहेत. यासाठी पोलादपूरमधील उमरठ, साखर येथे हेलिपॅडची निर्मिती केली आहे.अलिबाग येथील तीन रुग्णवाहिकांसह महाड नगरपालिका, महाड औद्योगिक वसाहत, रोहा-धाटाव औद्योगिक वसाहतीचे अग्निशमन बंब उपलब्ध असणार असून, ४५० अधिकारी व कर्मचारी ठिकठिकाणी तैनात ठेवण्यात येणार असल्याची माहिती शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत प्रांताधिकाऱ्यांनी दिलीे.

१७ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समवेत पत्नी रश्मी ठाकरे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, पुत्र तेजस ठाकरे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, खा. श्रीरंग बारणे आदीसह पालकमंत्री आदिती तटकरे, खा. सुनील तटकरे, आ. भरत गोगावले, जिल्हाधिकारी निधी चौधरी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. साखर येथे दोन हेलिपॅड निर्माण करण्याचे काम करण्यात येणार होते. मात्र, ग्रामस्थांनी ‘झाडे जगवा, झाडे वाचवा’ संदेश देत झाडे तोडण्यास अटकाव केल्याने साखर आणि उमरठ येथे एक हेलिपॅड तयार केले आहे. मुख्य कार्यक्रमाच्या ठिकाणी जाण्या-येण्यासाठी नव्याने रस्त्याचे काम करण्यात आले आहे.कार्यक्रमाच्या ठिकाणी पाण्याच्या व्यवस्थेसह बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. पितळवाडी प्राथमिक आरोग्यकेंद्र व कापडे येथील आरोग्यकेंद्रामध्ये वैद्यकीय पथक उपलब्ध असणार आहे. या ठिकाणी महाडचे वैद्यकीय अधिकारी डॉ. भास्कर जगताप व पोलादपूरचे डॉ. सोनवणे उपस्थित राहणार असल्याची माहिती बैठकीदरम्यान देण्यात आली. प्रांत कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत विविध खात्याचे अधिकारी, आ. भरत गोगावले आदी उपस्थित होते. या वेळी अधिकाऱ्यांनी उमरठ येथील विविध कामाची पाहणी केली.

टॅग्स :Puneपुणे