शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

नवले पुल परिसरात अपघातांची मालिका सुरूच; एकाच ठिकाणी दोन अपघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2023 12:34 IST

सेल्फी पॉइंटजवळ कंटेनर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने एका कारला पाठीमागून जोराची धडक दिली.

धायरी: मुंबई - बंगळुरू महामार्गावरील नवले पुल परिसरात अपघातांची मालिका सुरूच असून शुक्रवारी सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास नऱ्हे येथील सेल्फी पॉइंटजवळ कंटेनर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने एका कारला पाठीमागून जोराची धडक दिली. सुदैवाने ह्यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.  अपघातानंतर कंटेनर चालक पळून गेला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.  त्याच ठिकाणी ११.३० च्या सुमारास दुसरा अपघात झाला आहे. नवले पुल परिसरात गेल्या काही वर्षांपासून सतत अपघात घडत आहेत. प्रशासनाकडून हा परिसर ब्लॅक स्पॉट म्हणून घोषित केला आहे. तसेच अपघात रोखण्यासाठी तात्पुरत्या स्वरुपात येथे उपाययोजनाही करण्यात आल्या. तरीही या परिसरातील अपघाताचे सत्र मात्र काही केल्या थांबायला तयार नाही. महामार्गावर हा अपघात झाल्याने मोठी वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या रांगा दूरपर्यंत लागल्या होत्या. सिंहगड रस्ता वाहतूक  विभागाचे सहायक पोलिस निरीक्षक पांडुरंग वाघमारे व वाहतूक कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी पोहचून वाहतूक सुरळीत केली. तसेच राष्ट्रीय महामार्ग पेट्रोलिंग अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या साह्याने बाजूला केली आहे.  या परिसरात सातत्याने अपघात घडत असून बुधवारी देखील कंटेनर व ट्रकचा अपघात या परिसरात झाला होता. यात कंटेनर चालक किरकोळ जखमी झाला होता. 

अपघाताच्या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलीस चौकीचे आज उद्घाटन...

- नवीन कात्रज बोगदा ते नवले पुल परिसरात वारंवार होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांच्या वतीने नवीन कात्रज बोगद्याजवळ पोलीस चौकी उभारण्यात आली आहे. या नव्या वाहतूक पोलीस चौकीचे आज शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता पुण्याचे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी राजेश देशमुख, सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक, अप्पर पोलीस आयुक्त  प्रवीणकुमार पाटील, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम, वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर, पोलीस अधीक्षक अंकित गोयल, पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील आदी उपस्थित राहणार आहेत.

टॅग्स :PuneपुणेAccidentअपघातDhayariधायरीPoliceपोलिसhighwayमहामार्ग