शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांकडे आरोपांशिवाय काही उरलेलं नाही"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हुतात्म्यांना वाहिली आदरांजली
2
‘आधी बूथ कॅप्चर व्हायचं, आता उमेदवारच पळवले जाताहेत’, इंदूरमधील घटनेवरून काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
3
महाराष्ट्राच्या लुटारुंना लोकसभा निवडणुकीत जागा दाखवू; उद्धव ठाकरेंचा घणाघात
4
Delhi DPS Bomb Threat : दिल्लीतील शाळेला ईमेलद्वारे बॉम्बची धमकी, पोलीस घटनास्थळी दाखल
5
१०० वर्षांपेक्षा जुना इतिहास, Reliance इतकं मार्केट कॅप... Covishield लस तयार करणाऱ्या कंपनीची कहाणी
6
काहीही किंमत द्यायला लागली तरी चालेल, पण...; शरद पवारांचा भाजपाला इशारा
7
Success Story : स्कूल ड्रॉपआऊट, जे बनले देशातील सर्वात श्रीमंत ज्वेलर; देश-विदेशात पसरलाय व्यवसाय
8
आरक्षण, घटनेवर खोटा प्रचार सुरू; ४०० हून अधिक जागा जिंकणार : गृहमंत्री शाह
9
भाजप राज्यघटना फाडूनच फेकेल; घटनेची प्रत हाती धरून राहुल गांधी यांचा दावा
10
VIDEO : महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरेंचं रिल, महाराष्ट्रातील जनतेला केलं विशेष आवाहन
11
आजचे राशीभविष्य - १ मे २०२४; आर्थिक लाभ संभवतात अन् नशिबाची साथ लाभेल
12
मुख्यमंत्री महिलांच्या कपड्यांकडेच बघत असतात, कारण काय? माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांचा नितीश कुमारांवर पलटवार
13
वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना
14
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
15
वर्षा गायकवाड यांच्या रॅलीला उद्धवसेनेचे पाठबळ, नसीम खान, भाई जगताप नाराज?
16
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
17
भयंकर : प्रसूतीवेळी वीज गेली, टॉर्चच्या प्रकाशात सिझर; बाळासह आईचा मृत्यू
18
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
19
वैशाली दरेकर यांच्या मालमत्तेत २३ लाखांची वाढ; कर्ज नाही, स्वतःचे वाहन नाही
20
लालूंच्या कन्येकडे १५.८२ कोटींची संपत्ती; कोणतेही कर्ज नाही

लोणावळ्यात घरात चोरी करुन ज्येष्ठ महिलेचा खून

By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2020 7:00 PM

हा अपघात नसून चोरी करुन केलेला खून असल्याचे प्राथमिक तपासात समोर

लोणावळा : लोणावळ्यातील द्वारकामाई सोसायटीमध्ये आज दुपारच्या सुमारास एका ज्येष्ठ महिलेचा घरात चोरी करुन खून केला असल्याची धक्कादायक घटना घडली. दुपारी दिड वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला.    रेश्मा पुरुषोत्तम बनसल/अगरवाल (वय 70, रा. द्वारकामाई सोसायटी, लोणावळा) असे या ज्येष्ठ महिलेचे नाव आहे.  मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, द्वारकाईमाई सोसायटीमध्ये राहणार्‍या रेश्मा बन्सल ह्या आज सकाळी घरात एकट्याच होत्या. नित्य नियमांने त्या त्यांचे पती पुरुषोत्तम बनसल यांना दुपारी साडेबारा एक वाजता जेवणाचा डबा घेऊन दुकानावर जातात. आज त्या आल्या नाहीत म्हणून ते घरी आले असता दरवाजा बंद होता.

मागील बाजुच्या दरवाज्यातून ते आतमध्ये आले असता रेश्मा बन्सल ह्या घरातील त्यांच्या रुमच्या बाहेरील लाँबीमध्ये पडलेल्या होत्या. चक्कर येऊन पडल्या असाव्यात या अंदाजाने त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले मात्र त्या मयत झाल्या होत्या. घरी आल्यानंतर रुममधील साहित्य इतरत्र पडलेले दिसल्यानंतर हा अपघात नसून चोरी करुन केलेला खून असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. घटनेची माहिती समजताच लोणावळा  उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधिक्षक नवनीत काँवत, पोलीस निरीक्षक बी.आर.पाटील व कर्मचारी यांनी घटनास्थळाची पाहणी केली. या घटनेचा व सोसायटी परिसरातील सर्व सिसीटिव्ही कँमेरे यांच्या फुटेजच्या आधारे पुढील तपास सुरु आहे.

टॅग्स :lonavalaलोणावळाMurderखूनCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस