शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
2
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
3
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
4
"आज सासऱ्यांना मिस करतेय, रिंकूची खेळी त्यांच्यासाठी होती"; KKR जिंकल्यावर प्रिया सरोज भावूक
5
बर्थडे पार्टीत रक्ताचा सडा! चेहऱ्याला केक लावल्याच्या रागातून भाजप नेत्याच्या भावांसह तिघांची हत्या
6
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
7
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
8
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
9
Samudrik Shastra: सामुद्रिक शास्त्रानुसार हसण्याच्या पद्धतीवरून ओळखता येतात माणसाचे गुण-दोष!
10
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
11
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
12
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच पगारवाढ होणार, अर्थ मंत्रालयानं जारी केले निर्देश
13
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
14
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
15
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
16
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
17
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
18
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
19
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ काँग्रेस पदाधिकारी उत्तमराव भूमकर यांचे निधन; पुण्यातील काँग्रेस भवनमध्येच घेतला अखेरचा श्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2021 18:40 IST

काँग्रेस भवनमध्ये वृक्षारोपण करतानाच त्यांना अचानक चक्कर आली व ते खाली पडले. तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली.

ठळक मुद्देसलग ३० वर्षे पुण्यातील काँग्रेस भवनमध्ये कार्यालयीन सचिव म्हणून कार्यरत

पुणे: शहर काँग्रेसचे कार्यालयीन सचिव, ज्येष्ठ नागरिक काँग्रेसचे संस्थापक उत्तमराव भूमकर यांचे रविवारी दुपारी निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. काँग्रेस भवनमध्ये वृक्षारोपण करतानाच त्यांना अचानक चक्कर आली व ते खाली पडले. तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेस भवनमध्ये व्यर्थ न हो बलिदान या मोहिमेतंर्गत स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार व अन्य कार्यक्रम होणार होते. त्याची तयारी करत असतानाच भूमकर यांनी अखेरचा श्वास घेतला.

चव्हाण यांच्यासह काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, प्रदेश सरचिटणीस अँड. अभय छाजेड, शहर सरचिटणीस रमेश अय्यर व अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. भूमकर यांना श्रद्धांजली अर्पण करून सर्व कार्यक्रम स्थगित करण्यात आले.  

अल्पपरिचय

काँग्रेसच्या नव्याजून्या पिढीतील सर्वच पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये भूमकर परिचित होते. मागील जवळपास सलग ३० वर्षे ते काँग्रेस भवनमध्ये कार्यालयीन सचिव म्हणून काम पहात होते. वय झाले असले तरी कुटुंबिय, काँग्रेस पदाधिकारी यांचा रोष पत्करून ते पक्ष कार्यात सक्रिय होते. काँग्रेस भवनमधील रोजची फेरी त्यांनी कधीही चुकवली नाही. स्वच्छ पांढरा हाफ शर्ट, पँट, गांधी टोपी आणि सतत काही ना काही सांगण्याच्या अविर्भात अशी भूमकर यांची छबी काँग्रेस भवनमध्ये कायम ऊपस्थित असे.

सत्तेचा लोभ त्यांना कधीही नव्हता. शिक्षण मंडळाचे एकदा ते सदस्य झाले. त्याशिवाय त्यांना सत्तेचे कोणतेही पद कधी मिळाले नाही. त्याची खंत कधीही त्यांच्या बोलण्यावागण्यात दिसत नसे. काँग्रेसबद्दल त्यांना फार प्रेम होते. भूमकर यांचा सोमवारी ८३ वा वाढदिवस होता. त्यानिमित्त प्रुथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते त्यांचा  रविवारी सन्मान करण्यात येणार होता. तत्पूर्वीच त्यांनी जगाचा निरोप घेतला.

टॅग्स :Puneपुणेcongressकाँग्रेसBJPभाजपाDeathमृत्यू