ज्येष्ठ, दिव्यांगांना घरबसल्या मतदानाची सोय नाही; नगर परिषद, नगरपंचायत निवडणुकीत मतदान केंद्रावरच जावे लागणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2025 13:56 IST2025-11-29T13:55:58+5:302025-11-29T13:56:28+5:30

निवडणूक कर्मचाऱ्यांच्या अभावी ही सुविधा देण्यात येणार नसल्याचे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले असून, ज्येष्ठ तसेच दिव्यांगांना आता मतदान केंद्रावर येऊनच मतदान करता येणार आहे

Senior citizens and disabled people do not have the facility to vote from home; they will have to go to the polling booth for the municipal council and nagar panchayat elections. | ज्येष्ठ, दिव्यांगांना घरबसल्या मतदानाची सोय नाही; नगर परिषद, नगरपंचायत निवडणुकीत मतदान केंद्रावरच जावे लागणार

ज्येष्ठ, दिव्यांगांना घरबसल्या मतदानाची सोय नाही; नगर परिषद, नगरपंचायत निवडणुकीत मतदान केंद्रावरच जावे लागणार

पुणे: लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये ज्येष्ठ, तसेच दिव्यांग मतदारांना देण्यात आलेली घरबसल्या मतदानाची (होम व्होटिंग) सुविधा येत्या २ डिसेंबर रोजी होणाऱ्या नगर परिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकीत नसेल. निवडणूक कर्मचाऱ्यांच्या अभावी ही सुविधा देण्यात येणार नसल्याचे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले असून, ज्येष्ठ तसेच दिव्यांगांना आता मतदान केंद्रावर येऊनच मतदान करता येणार आहे.

राज्यात २४६ नगर परिषद आणि ४२ नगरपंचायतींसाठी निवडणुका होत आहेत. तर, पुणे जिल्ह्यात १४ नगर परिषदा आणि तीन नगरपंचायतींमध्ये येत्या २ डिसेंबर रोजी मतदान होत आहे. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांप्रमाणे मतदान वाढीसाठी विशेष मोहिमा, जागरूकता उपक्रम अथवा घरभेटी घेण्याचे प्रयत्न झाले. मात्र, या निवडणुकीत निवडणूक कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने अशा स्वरूपाच्या कुठल्याही मोहिमा राबवण्यात आलेल्या नाहीत. तसेच, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ज्येष्ठ व दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडून घरोघरी जाऊन ‘१२ ड’ अर्ज भरून घेण्यात येत असत. मात्र, नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांपूर्वी अशी कोणतीही प्रक्रिया राबविण्यात आली नाही.

दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाने गुरुवारी (दि.२७) सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची दोन टप्प्यांत ऑनलाइन बैठक घेतली. मतदान केंद्रांवर वीजपुरवठा, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता आदी सोयीसुविधांबाबत सूचना देण्यात आल्या. यावेळी दिव्यांग व ज्येष्ठांना घरातून मतदानाची सुविधा देण्याबाबत विचारणा झाली असता, उपलब्ध कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असल्याने अशी सुविधा देणे शक्य नसल्याचे आयोगाने स्पष्ट केले. मतदान केंद्रांवर ज्येष्ठ व दिव्यांग मतदारांसाठी रॅम्पची सुविधा उपलब्ध करणे, व्हीलचेअर ठेवणे, तसेच अपंगत्व असलेल्या मतदारांसाठी तळमजल्यावरच मतदान केंद्र, ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या.

पुणे जिल्ह्यात १४ नगर परिषद व ३ नगरपंचायतींसाठी निवडणुका होत असून, एकूण ६ लाख ३४ हजार ९४० मतदारांसाठी ७२३ मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत. दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांना या केंद्रांवर प्रत्यक्ष जाऊन मतदान करावे लागणार आहे. घरातून मतदान करण्याची कुठलीही सुविधा मतदारांना उपलब्ध नाही.

Web Title : स्थानीय चुनावों में वरिष्ठों, विकलांगों के लिए घर से मतदान नहीं

Web Summary : आगामी स्थानीय चुनावों में वरिष्ठ और विकलांग मतदाताओं को मतदान केंद्रों पर ही मतदान करना होगा। चुनाव आयोग ने कहा कि कर्मचारियों की कमी के कारण घर से मतदान उपलब्ध नहीं है। मतदान केंद्रों पर रैंप और व्हीलचेयर उपलब्ध कराए जाएंगे।

Web Title : No Home Voting for Seniors, Disabled in Local Elections

Web Summary : Senior and disabled voters must vote at polling stations for upcoming local elections. Home voting is unavailable due to staff shortages, the election commission stated. Ramps and wheelchairs will be provided at polling places.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.