शनिवार पेठेतील ज्येष्ठाची झोपच उडाली; पुणे महापालिकेने पाण्याचे बिल पाठवले तब्बल १० लाख

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 14:03 IST2025-03-17T14:03:02+5:302025-03-17T14:03:24+5:30

दर महिन्याला साधारण शंभर ते दोनशे रुपयांच्या दरम्यान पाण्याचे बिल त्यांना येते, मार्च महिन्यात नेमकं घडलं काय?

Senior citizen from Shaniwar Peth lost sleep Pune Municipal Corporation sent water bill worth Rs 10 lakh | शनिवार पेठेतील ज्येष्ठाची झोपच उडाली; पुणे महापालिकेने पाण्याचे बिल पाठवले तब्बल १० लाख

शनिवार पेठेतील ज्येष्ठाची झोपच उडाली; पुणे महापालिकेने पाण्याचे बिल पाठवले तब्बल १० लाख

पुणे : शनिवार पेठेतील एका ज्येष्ठ नागरिकाला पुणे महापालिकेने चक्क १० लाख ७६ हजार रुपयांचे पाणीवापराचे बिल पाठविले आहे. मोबाइल क्रमांकावर आलेल्या या चुकीच्या बिलामुळे ७५ वर्षांच्या गोविंद गोरे या ज्येष्ठ नागरिकाची झोप उडाली आहे.

शनिवार पेठेत गाेरे राहतात. त्यांना महापालिकेकडून मीटरने पाणीपुरवठा केला जातो. दर महिन्याला साधारण शंभर ते दोनशे रुपयांच्या दरम्यान पाण्याचे बिल त्यांना येते. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात त्यांच्या मोबाइल क्रमांकावर महापालिकेचे पाण्याचे बिल थकीत असल्याचा संदेश आला. त्यांच्याकडे १० लाख ७६ हजार ५९ रुपयांचे बिल थकीत असल्याचे त्यात नमूद करण्यात आले होते. गोविंद गोरे यांना आलेल्या बिलामध्ये मोबाइल क्रमांक त्यांचा असला, तरी प्रत्यक्षात नाव मात्र दुसऱ्याच व्यक्तीचे आहे. या बिलावरील पत्ता त्यांच्या जवळच्या भागातील आहे. या चुकीच्या बिलाबद्दल गोविंद गोरे यांनी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे तक्रार केली. मात्र, त्याची दखल घेऊन त्यांना कोणताही सकारात्मक प्रतिसाद महापालिकेने दिला नाही. या बिलाची बारकाईने तपासणी केली असता, बिलावर असलेला ग्राहक क्रमांक आपला नसल्याचे गोरे यांच्या लक्षात आले; पण हे बिल काढताना त्यांचा मोबाइल क्रमांक टाकण्यात आल्याने बिलाची थकबाकी त्यांच्याच क्रमांकावर दाखविण्यात आली आहे.

Web Title: Senior citizen from Shaniwar Peth lost sleep Pune Municipal Corporation sent water bill worth Rs 10 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.