Pune | वाहनाच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू; घोरपडी गाव परिसरातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2023 08:53 AM2023-03-29T08:53:47+5:302023-03-29T08:56:58+5:30

अपघातानंतर पसार झालेल्या वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला...

Senior citizen dies in vehicle collision; Incident in Ghorpadi gaon area | Pune | वाहनाच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू; घोरपडी गाव परिसरातील घटना

Pune | वाहनाच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू; घोरपडी गाव परिसरातील घटना

googlenewsNext

पुणे : भरधाव वाहनाच्या धडकेने सायकलस्वार ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना घोरपडी गाव परिसरात घडली. अपघातानंतर पसार झालेल्या वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रामदास केशव पाटोळे (वय ६५, रा. कासेवाडी, भवानी पेठ), असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याबाबत कैलास पाटोळे (वय ५८, रा. कासेवाडी, भवानी पेठ) यांनी वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रामदास पाटोळे सायकलवरून घोरपडी गाव परिसरातील व्हिक्टोरिया रस्त्याने निघाले होते. त्यावेळी भरधाव वाहनाने सायकलस्वार पाटोळे यांना धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या पाटोळे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पसार झालेल्या वाहन चालकाचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत असून, पोलिस उपनिरीक्षक प्रवीण खरवडे तपास करत आहेत.

Web Title: Senior citizen dies in vehicle collision; Incident in Ghorpadi gaon area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.