Accident: अंधारात बंधाऱ्यावरून पाय घसरून पडल्याने जेष्ठ नागरिकाचा मुत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2021 07:16 PM2021-10-24T19:16:09+5:302021-10-24T19:16:27+5:30

खेड तालुक्यातील साबुर्डी येथे केटीवेअर बंधाऱ्यावरून पाय घसरून पडल्यामुळे जेष्ठ नागरिकाचा मुत्यू झाला आहे.

senior citizen dies after slipping on embankment in darkness | Accident: अंधारात बंधाऱ्यावरून पाय घसरून पडल्याने जेष्ठ नागरिकाचा मुत्यू

Accident: अंधारात बंधाऱ्यावरून पाय घसरून पडल्याने जेष्ठ नागरिकाचा मुत्यू

Next

राजगुरुनगर : खेड तालुक्यातील साबुर्डी येथे केटीवेअर बंधाऱ्यावरून पाय घसरून पडल्यामुळे जेष्ठ नागरिकाचा मुत्यू झाला आहे. किसन भिकाजी गोपाळे रा. साबुर्डी ता खेड असे मुत्यू झालेल्या जेष्ठ नागरिकाचे नांव आहे. हि घटना शनिवार दि २३ रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घडली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, गोपाळे साबुर्डी येथील ओढयावरील केटीवेअर बंधाऱ्यावरुन रात्री ९ वाजण्याच्या सुमारास जात घरी जात होते. अंधार असल्यामुळे अंदाज न आल्यामुळे बंधाऱ्यावरून तोल जाऊन पाय घसरून ओढयात दगडावर पडले. गोपाळे यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने जागीच मूत्यू झाला. या घटनेबाबत गोपाळे यांचा भाचा राजेंद्र लक्ष्मण शिंदे रा. कोहिंडे (ता खेड ) यांनी खेड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पुढील तपास पोलिस हवालदार शेखर भोईर करित आहे.

Web Title: senior citizen dies after slipping on embankment in darkness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app