Pune : बहुळमध्ये भरधाव पिकअपच्या धडकेने जेष्ठ नागरिकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2022 10:15 IST2022-10-13T10:14:12+5:302022-10-13T10:15:33+5:30
चाकण - शिक्रापूर राज्यमहामार्गावर बहुळ गावच्या हद्दीत....

Pune : बहुळमध्ये भरधाव पिकअपच्या धडकेने जेष्ठ नागरिकाचा मृत्यू
शेलपिंपळगाव (पुणे) : चाकण - शिक्रापूर राज्यमहामार्गावर बहुळ गावच्या हद्दीत रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या ६२ वर्षीय जेष्ठ नागरिकास भरधाव पिकअप वाहनाने धडक देऊन झालेल्या अपघातात ६२ वर्षीय जेष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक विनोद शेंडकर यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात मंगळवारी (दि.११) दुपारी पावणेदोनच्या सुमारास बहुळ गावातील चांदणी चौकात झाला. अपघातात कोंडीराम साहेबराव साबळे (वय ६२ वर्षे धंदा शेती रा. बहुळ ता. खेड जि. पुणे) हे यांचा मृत्यू झाला आहे. कोंडीराम साबळे हे रस्त्याच्या कडेला उभे असताना शिक्रापूर बाजूकडून भरधाव येणाऱ्या पिकअप गाडीने (एम एच १४ सी पी ५४२२) साबळे यांना जोरात धडक दिली.
वाहनाच्या धडकेने कोंडीराम साबळे यांच्या डोक्याला, हात व पायाला मार लागुन गंभीर जखम होऊन त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान पिकअप गाडीचा चालक मारुती जयवंत सातकर (वय ४० वर्षे रा. मु.पो कान्हेफाटा ता. मावळ जि. पुणे) यांस अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी उमेश पांडुरंग साबळे (वय ४४ वर्षे धंदा शेती मु.पो बहुळ ता खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.