ताडी पिताना किरकोळ वादातून बेदम मारहाण; ज्येष्ठाचा मृत्यू, वानवडीतील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2025 14:48 IST2025-04-26T14:48:18+5:302025-04-26T14:48:54+5:30

मारहाणीत ज्येष्ठाला दुकानातील लोखंडी दरवाज्यावर ढकलून दिल्याने डोक्याला गंभीर दुखापत झाली होती

Senior citizen beaten up over minor dispute while drinking toddy incident in Wanawadi | ताडी पिताना किरकोळ वादातून बेदम मारहाण; ज्येष्ठाचा मृत्यू, वानवडीतील घटना

ताडी पिताना किरकोळ वादातून बेदम मारहाण; ज्येष्ठाचा मृत्यू, वानवडीतील घटना

पुणे : किरकोळ वादातून तिघांनी ज्येष्ठाला बेदम मारहाण करून त्याचा खून केल्याची घटना वानवडी भागात घडली. याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मलंग मेहबूब कुरेशी (६०, रा. शिवनेरीनगर, कोंढवा) असे खून झालेल्याचे नाव आहे. याबाबत त्यांचा मुलगा सोहेल (२८) यांनी वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी आदिल शेख, आकाश धांडे यांच्यासह साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मलंग कुरेशी शुक्रवारी (दि. २५) दुपारी साडेचारच्या सुमारास वानवडीतील शांतीनगर भागात एका ताडी विक्री दुकानात गेले होते. तेथे ताडी पित असताना आरोपींशी त्यांचा किरकोळ कारणावरून वाद झाला. आरोपी शेख, धांडे आणि साथीदाराने कुरेशी यांना बेदम मारहाण केली. त्यांना दुकानातील लोखंडी दरवाज्यावर ढकलून दिले. कुरेशी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस आयुक्त धन्यकुमार गोडसे, वानवडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सत्यजीत आदमाने यांनी घटनास्थळी भेट दिली. पसार झालेले आरोपी शेख आणि धांडे यांना ताब्यात घेण्यात आले. रात्री उशीरा गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली. आरोपींबरोबर पांडा नावाचा एक जण होता. त्याचा शोध सुरू आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक वाकडे करत आहेत.

Web Title: Senior citizen beaten up over minor dispute while drinking toddy incident in Wanawadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.