तुझे 'त्या' अवस्थेत काढलेले फोटो आईला पाठवेन; अल्पवयीन मुलीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2023 12:42 IST2023-01-23T12:31:20+5:302023-01-23T12:42:48+5:30

अल्पवयीन मुलीला प्रेमात पाडून, लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार

Send a photo of you in 'that' state to your mother Abuse of a minor girl | तुझे 'त्या' अवस्थेत काढलेले फोटो आईला पाठवेन; अल्पवयीन मुलीवर अत्याचार

तुझे 'त्या' अवस्थेत काढलेले फोटो आईला पाठवेन; अल्पवयीन मुलीवर अत्याचार

पुणे : अल्पवयीन मुलीला प्रेमात पाडून, लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला. तसेच तिचे नग्न अवस्थेतील व्हिडीओ काढून ते व्हायरल करण्याची धमकी दिली. याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

हणमंत किसन सांगळे (वय २४, रा. गणेशनगर, वाघोली) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी एका ३५ वर्षीय महिलेने लोणीकंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार ऑगस्ट २०२१ ते १६ जानेवारी २०२३ दरम्यान घडला. तुझे काढलेले नग्न अवस्थेतील व्हिडीओ क्लिप व फोटो तुझ्या आईला पाठवेल अशी धमकी दिली. त्यामुळे घाबरून तिने हा प्रकार आईला सांगितला. त्यानंतर त्यांनी फिर्याद दिली असून, पोलिस उपनिरीक्षक भदे तपास करीत आहेत.
 

Web Title: Send a photo of you in 'that' state to your mother Abuse of a minor girl