शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्या बोगद्यातून होईल विकासाचा मार्ग खुला

By admin | Updated: August 5, 2014 00:17 IST

मुख्यमंत्र्यांच्या मागणीलाही वाटाण्याच्या अक्षता

शिरवळ : खंडाळ्याचा घाट चढून सातारा जिल्ह्यात प्रवेश करणे सध्या जिकिरीचे आहे. यामुळे शिरवळ परिसरात मोठ्या कंपन्यांनी आपले बस्तान बसविले आहे. खंबाटकी घाटात आणखी एक बोगदा झाल्यास वाहतुकीचा मार्ग सुकर होणार असून दुसऱ्या बोगद्यामुळे साताऱ्याच्या विकासाचा मार्गही खुला होण्यास मदत होणार आहे.राष्ट्रीय महामार्गावरील खंबाटकी घाट हे अपघातांचे माहेरघर आणि मृत्यूचे प्रवेशद्वार बनले आहे. याठिकाणी पुण्याहून साताऱ्याकडे जाण्यासाठी अवघड वळणांचे एकेरी मार्ग घाटातून आहे, तर साताराहून पुण्याकडे येण्यासाठी बोगदामार्गे वाहतूक वळविण्यात आलेली आहे. वास्तविक पुण्याकडून साताऱ्याकडे जाताना अवघड वळणांचा साडेनऊ किलोमीटरचा खंबाटकी घाट ओलांडावा लागतो. त्यामुळे अवजड वाहतूक धोकादायक बनली आहे. ही अडचण सातारा जिल्ह्याच्या विकासाला मारक ठरत आहे. दरम्यान, सुरक्षित प्रवासाच्या दृष्टीने खंबाटकी घाटात आणखी एक बोगदा व्हावा, अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन केली आहे. सातारहून पुण्याकडे जाताना बोगद्यामार्गे हे अंतर सहा किलोमीटर पडते. अंतर वाचविण्यासाठी दुचाकीचालकांसह वाहनधारक आपला जीव धोक्यात घालून बोगद्यामार्गे विरुध्द दिशेने प्रवास करतात. सध्या या घाटात संरक्षक कठडेही मोठ्या प्रमाणात तुटले आहेत, त्यामुळे याठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. याकडे कानाडोळा केल्याचे चित्र दिसत आहे.याठिकाणी नवीन बोगदा निर्माण झाल्यास जाण्यायेण्याचा मार्ग सुकर होणार आहे. तसेच नवीन बोगद्याची निर्मिती झाल्यास अंतर, वेळ आणि पैसे वाचणार आहेतच पण एखाद्या अपघातामुळे होणारा वाहतुकीची खोळंबा थांबणार आहे. (प्रतिनिधी)मुख्यमंत्र्यांच्या मागणीलाही वाटाण्याच्या अक्षताराष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ चे सध्या सहापदरीकरणाचे काम संथगतीने सुरू आहे. निष्कृष्ट दर्जाच्या काम होत असल्याबाबत मंत्रालय स्तरावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, रिलायन्स, लोकप्रतिनिधी, स्थानिक प्रतिनिधी यांच्या अनेकदा बैठका झाल्या. या बैठकीत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी याठिकाणी नवीन बोगदा होणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, आजतागायत यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. आतातरी खासदार उदयनराजे भोसले यांच्या मागणीला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व केंद्रीय मंत्री प्रतिसाद देणार का, याबाबत प्रश्नचिन्ह आहे.