Fire In Pune: पुण्यातील शिवणे येथे भंगाराच्या दुकानाला आग; जीवितहानी टळली
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2022 14:57 IST2022-05-23T14:57:13+5:302022-05-23T14:57:25+5:30
आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे ६ बंब पाचारण करण्यात आले होते

Fire In Pune: पुण्यातील शिवणे येथे भंगाराच्या दुकानाला आग; जीवितहानी टळली
शिवणे: शिवणे येथील देशमुखवाडी परिसरात असलेल्या एका भंगाराच्या दुकानाला मध्यरात्री आग लागण्याची घटना घडली आहे. मध्यरात्री आग लागल्यामुळे आगीचे निश्चित कारण समजू शकले नाही. आगीचे स्वरूप इतके मोठे होते की आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे ६ बंब पाचारण करण्यात आले होते. भंगार , प्लास्टिक आणि वायर अशा वस्तू असल्यामुळे आग मोठ्या प्रमाणात भडकली.
आगीचे लोट खूप उंची पर्यंत गेले होते. ज्यामुळे शेजारील इमारतीमधील नागरिक भीतीमुळे रस्त्यावर आले होते.शेजारील दोन इमारती मध्ये धुराचे लोट जात होते. आगीमध्ये कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नसून शेजारी उभी असलेल्या एका कार चे नुकसान झाले आहे. आगीची माहिती मिळताच उत्तमनगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी पोहचले आणि त्यांच्या वतीने आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात आले.