शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

मुरूमचोरांचा उद्योजकाच्या भूखंडावर डल्ला

By admin | Updated: June 18, 2015 22:38 IST

लहानमोठे उद्योगधंदे सुरू करण्यासाठी व्यावसायिकांनी एमआयडीसीकडून खरेदी केलेल्या भूखंडांमधून मोठ्या प्रमाणात मुरूम आणि माती यांची चोरी होत आहे.

आंबेठाण : लहानमोठे उद्योगधंदे सुरू करण्यासाठी व्यावसायिकांनी एमआयडीसीकडून खरेदी केलेल्या भूखंडांमधून मोठ्या प्रमाणात मुरूम आणि माती यांची चोरी होत आहे. याबाबत पोलीस आणि एमआयडीसी यांना कळवूनही या मुरूमचोरांवर कारवाई होत नसल्याने उद्योजक त्रस्त झाले आहेत. ही चोरी करताना अन्य मालमत्तेचेदेखील नुकसान केले जाते.चाकण औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक दोनमध्ये सध्या भूखंडांचे वाटप आणि त्या भूखंडांचे विकसन करण्याचे काम सुरू आहे. या ठिकाणी भूखंड घेतलेले अनेक व्यावसायिक परगावी राहतात. या परिसरासह आजूबाजूच्या भागातदेखील औद्योगिकीकरण होत आहे, तसेच बांधकाम व्यवसायदेखील तेजीत आहे. या ठिकाणी भरावासाठी मुरूम आवश्यक आहे. त्यासाठी असे भूखंड शोधले जातात आणि रात्री त्या ठिकाणी डल्ला मारून रातोरात त्याची चोरी करून तो अन्य ठिकाणी हलविला जातो आणि त्यामधून लाखो रुपये कमावले जात आहेत. त्याचप्रमाणे मातीचीदेखील चोरी केली जात आहे.याबाबत अनेक उद्योजकांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे; परंतु पोलीसदेखील मूग गिळून गप्प आहेत. या चोरीबाबत महसूल विभाग तर चुप्पी साधून आहे. माहिती असूनही ते या मुरूमचोरांवर कारवाई करण्यास धजावत नाहीत. त्यांच्या या कारवाई न करण्यामागचे कारण मात्र गुलदस्तात आहे. अशा होणाऱ्या चोऱ्यांमुळे या भागात येणारे उद्योजक मात्र त्रस्त झाले आहेत. या परिसरात अनेक ठिकाणी स्वमालकीच्या भूखंडातून, तर काही ठिकाणी एमआयडीसीच्या मालकीच्या जागेतून ही चोरी केली जात आहे. या चोऱ्या बहुतांश रात्रीच्या वेळी केल्या जात आहेत. त्यामुळे या भागात रात्रीच्या वेळी गस्त सुरू करण्याची मागणी केली जात आहे.याबाबत एमआयडीसीचे चिंचवड येथील कायर्कारी अभियंता पांगारे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, की या मुरूमचोरीबाबत तहसीलदारांना माहिती दिली आहे आणि पुन्हा अशा चोऱ्या होत असतील, तर नव्याने पुन्हा माहिती महसूलला देऊ. तसेच, वीजवितरण कंपनीलादेखील याबाबत माहिती दिली जाईल. (वार्ताहर)चोरी करताना वीजवितरण कंपनीचे खांबदेखील सोडले जात नाहीत. या खांबांना अगदी खेटून मुरूम आणि माती उकरली जात आहे. त्यामुळे हे खांब निराधार झाले असून, ते वाऱ्याने किंवा पावसाच्या माऱ्याने सहज कोसळतील, अशी स्थिती आहे. या वीजवाहिन्या ३३ के.व्ही.च्या आहेत. त्यामुळे भविष्यात या ठिकाणी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही चोरी करताना उद्योजकांच्या अन्य मालमत्तेचे नुकसान केले जाते. यात भूखंडाला केलेले दगडी किंवा तारेचे कंपाऊंड पाडले जाते आणि नुकसान केले जाते.