शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

शालेय परिवहन समित्या कागदावरच

By admin | Updated: June 18, 2015 00:20 IST

विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी शाळांमध्ये स्थापन करण्यात आलेल्या शालेय परिवहन समित्या कागदावरच मर्यादित राहिल्या आहेत.

राजानंद मोरे, पुणेविद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी शाळांमध्ये स्थापन करण्यात आलेल्या शालेय परिवहन समित्या कागदावरच मर्यादित राहिल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या वाहतुकीचे नियोजन करून, त्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यासाठी आवश्यक उपाय योजना करण्याचे काम या समित्यांनी करणे आवश्यक आहे. मात्र, सद्यस्थितीत शहरात सर्व नियम धाब्यावर बसवून अनेक बस, रिक्षा व व्हॅनमधून धोकादायक पद्धतीने विद्यार्थी वाहतूक केली जात आहे. शाळा सुरू होण्यापूर्वी किंवा सुटल्यानंतर रस्त्यावर येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेकडे बहुतेक शाळा दुर्लक्ष करीत असल्याचे निदर्शनास आले. शालेय; तसेच परिवहन विभागाने सर्व शाळांना विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीच्या दृष्टीने नियमावली तयार केली आहे. विशेषत: स्कूल बसबाबत विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. प्रत्येक शाळेत शालेय परिवहन समिती स्थापन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. शहरातील सुमारे ८० टक्क्यांपेक्षा जास्त शाळांमध्ये ही समिती स्थापन करण्यात आली आहे. शाळेतील विद्यार्थ्यांच्या वाहतुकीबाबत योग्य नियोजन करण्याची जबाबदारी या समित्यांवर टाकण्यात आली आहे. स्कूल बस, रिक्षा, व्हॅनचालकांची बैठक घेणे, त्यांना विद्यार्थी सुरक्षिततेबाबत सूचना देणे, बसचालकाकडून सर्व नियम पाळले जात आहेत किंवा नाही, याची तपासणी करणे, रिक्षा, व्हॅनमधील विद्यार्थ्यांच्या वाहतुकीबाबत दक्षता घेण्याची जबाबदारी समितीवर निश्चित करण्यात आली आहे. मात्र, बहुतेक शाळांंकडून विद्यार्थी वाहतुकीकडे दुर्लक्ष केले जात आहेत़स्कूल बसमध्ये महिला किंवा पुरुष सहायक, अग्निशमन यंत्रणा, प्रथमोपचार पेटी असणे आवश्यक आहे. तसेच, बस सुरू असताना दरवाजा बंद करणेही सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. मात्र, याकडे बसचालक; तसेच सहायकही काणाडोळा करताना दिसतात. काही बसेसमध्ये सहायकही आढळून आले नाहीत; तसेच क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी घेऊन जाणाऱ्या बसही पाहायला मिळाल्या. रिक्षांना केवळ प्रवासी वाहतूक करण्याचा परवाना देण्यात आला आहे. या नियमानुसार १२ वर्षांखालील मुले असल्यास रिक्षामध्ये ४ विद्यार्थ्यांना घेऊन जाण्यास परवानगी असल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी सांगतात. मात्र, एका रिक्षामधून १० पेक्षा जास्त विद्यार्थी दाटीवाटीने नेले जात आहेत. रिक्षाप्रमाणेच व्हॅनमधूनही मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी वाहतूक केली जाते. काही ठराविक पद्धतीच्या व्हॅनलाच यासाठी परवानगी देण्यात आली आहे. असे असतानाही सुरक्षिततेच्या कोणत्याही उपाययोजना नसलेल्या व्हॅन विद्यार्थी वाहतूक करताना दिसून आल्या.नियमबाह्य विद्यार्थी वाहतुकीवर होणार कारवाईनियमबाह्य विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई सुरू केली जाणार आहे. ही कारवाई स्कूल बससह रिक्षा व व्हॅनवरही केली जाणार आहे. त्यासाठी सध्या तीन पथके तयार करण्यात आली आहेत. पुढील आठवड्यात आणखी तीन पथके या कारवाईसाठी दिली जातील. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करून वाहतूक करणाऱ्यांविरोधात यापुढे कडक कारवाई केली जाणार आहे.- जितेंद्र पाटील, प्रादेशिक परिवहन अधिकारी