शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
6
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
7
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
8
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
9
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
10
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
11
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
12
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
13
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
14
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
15
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
16
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
17
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
18
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
19
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
20
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

शाळा क्रमांक १ आणि ८ भरणार नवीन जागेत

By admin | Updated: June 13, 2015 04:29 IST

जीर्ण आणि मोडकळीस आलेल्या बारामती नगरपालिका शिक्षण मंडळाच्या शाळा क्रमांक १ आणि ८ च्या दुरवस्थेकडे पालिकेचे लक्ष गेले आहे

बारामती : जीर्ण आणि मोडकळीस आलेल्या बारामती नगरपालिका शिक्षण मंडळाच्या शाळा क्रमांक १ आणि ८ च्या दुरवस्थेकडे पालिकेचे लक्ष गेले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून धोकादायक स्थितीतच गोरगरीब कुटुंबातील मुले या शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत. यावर्षीची शाळा सुरू होण्यास काही दिवसच उरलेले असतानाच दोन्ही शाळा पर्यायी ठिकाणी भरविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या शाळा इमारतींच्या दुरवस्थेबाबत ‘लोकमत’ने सातत्याने पाठपुरावा केला. त्याची दखल नगरपालिका प्रशासनाने घेऊन या दोन्ही शाळांचे प्रश्न मार्गी लावण्याचा ठराव करण्यात आला आहे. शाळा क्रमांक ८ ही शाळा दि कॉन्फरन्स आॅफ चर्चेस आॅफ ख्राईस्ट इन वेस्टर्न इंडिया या संस्थेच्या जागेवर आहे. १० ते १२ वर्षांपासून शाळेची दयनीय अवस्था झाली आहे. या संस्थेने शाळा बांधून इमारत त्यांच्याकडे हस्तांतरित करावी, असा प्रस्ताव दिला आहे. यावर्षी शाळा त्याच इमारतीत भरवणे धोकादायक असल्याचे पत्र शिक्षण मंडळ प्रशासन अधिकाऱ्यांनी दिले आहे. त्याचबरोबर शाळा क्रमांक १ ची जागा मूळ मालकाने परत मागितली आहे. १९९६ पासून त्यांनी नगरपालिकेकडून भाडेदेखील घेतलेले नाही. त्यामुळे या शाळेची इमारत गळते. विद्यार्थ्यांची गैरसोय होते. त्या ठिकाणी सोयीसुविधा करता येत नाही, असा प्रस्ताव दिला आहे. तात्पुरत्या स्वरूपात शाळा क्रमांक १ दुर्गा सिनेमागृहासमोरील श्री बाबासाहेब देशमुख समाज मंदिरामध्ये हस्तांतरित करण्याबाबत कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. तर शाळा क्रमांक ८ ची भूसंपादन प्रक्रियेबाबत संबंधित संस्थेच्या ट्रस्टींबरोबर चर्चा सुरू आहे. (प्रतिनिधी)