'कॉलेजचा भाई मीच' म्हणत सराईत गुन्हेगाराचा पुण्यातील नामांकित महाविद्यालयात राडा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2022 12:53 PM2022-04-30T12:53:18+5:302022-04-30T12:57:36+5:30

आरोपींवरुद्ध गुन्हा दाखल...

saying I am the don of the college the criminal went to a reputed college in pune | 'कॉलेजचा भाई मीच' म्हणत सराईत गुन्हेगाराचा पुण्यातील नामांकित महाविद्यालयात राडा

'कॉलेजचा भाई मीच' म्हणत सराईत गुन्हेगाराचा पुण्यातील नामांकित महाविद्यालयात राडा

Next

पुणे : वर्चस्ववादातून पुण्यातील नामांकित महाविद्यालयात 10 ते 11 जणांच्या टोळक्याने एका विद्यार्थ्याला कॉलेजमधून बाहेर नेऊन लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. आंबेगाव खुर्द येथील सिंहगड कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स याठिकाणी शुक्रवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सराईत गुन्हेगार विकास उर्फ विकी चावडा याच्यासह मोहन राठोड, चेतन थोरे, साहिल गायकवाड यांच्यासह सहा अनोळखी आरोपींवरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अथर्व दीपक चौधरी (वय 19) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार विकास उर्फ विकी चावडा यांनी फिर्यादी अथर्व चौधरी यांना महाविद्यालयात फोन करून बोलावून घेतले. त्यानंतर फिर्यादीला दमदाटी करत"तू माझे ऐकत नाही का? "मी भाई आहे या कॉलेजचा' असे म्हणून त्या तिला हाताने मारहाण केली. त्यानंतर त्यांच्यातीलच एका अनोळखी मुलाच्या दुचाकीवर बसवून "थांब तुला जीवे मारून टाकतो, तू माझे ऐकत नाही का? असे म्हणून कॉलेजच्या पार्किंग मधून त्याला बाहेर नेले आणि "मी भाई आहे इकडचा" असे म्हणत लाकडी बांबू व लाथाबुक्क्यांनी त्याला बेदम मारहाण केली. तसेच आजूबाजूच्या दुकानदार व रस्त्यावरील लोकांना मदतीला आला तर तुम्हालाही मारल अशी धमकी दिली. भारती विद्यापीठ पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक घोगरे करीत आहे.

Web Title: saying I am the don of the college the criminal went to a reputed college in pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.