सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 12:57 IST2018-05-07T12:56:48+5:302018-05-07T12:57:24+5:30

वाणिज्य विभागात दुसऱ्या सत्रात तो शिकत असलेल्या विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे.

Savitribai Phule students death due to heart attack | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

ठळक मुद्देहोस्टेल नंबर ४ रुम नंबर १६ मध्ये तो राहायला होता

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात होस्टेलमध्ये राहणाऱ्या एका विद्यार्थ्याला सोमवारी सकाळी ह्रदयविकाराचा झटका आला. त्याला उपचारासाठी ससून रुग्णालयात हलविण्यात आले असता त्याला मृत घोषित करण्यात आले.
ऋषीकेश आहेर (घारगाव, ता.संगमनेर जि. अहमदनगर) असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. वाणिज्य विभागात दुसऱ्या सत्रात तो शिकत असून आजच त्याचा दुसऱ्या सत्रातील पहिला पेपर होता.
होस्टेल नंबर ४ रुम नंबर १६ मध्ये तो राहायला होता. सोमवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास त्याला अचानक त्रास होऊ लागला. तो ओरडायला लागल्याने शेजारील इतर विद्यार्थ्यांनी त्याच्याकडे धाव घेत सुरक्षा रक्षकांना बोलावून घेतले. यानंतर त्याला विद्यापीठातील आरोग्य केंद्रात नेण्यात आले मात्र, तो जास्त सिरीयस असल्याने तेथील डॉक्टरांनी त्याला ससूनला हलवण्यास सांगितले.  ससूनला घेऊन गेल्यानंतर तिथे उपचारादरम्यान डाँक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

Web Title: Savitribai Phule students death due to heart attack