सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा 14 एप्रिलपर्यंत स्थगित

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2020 14:50 IST2020-03-28T14:41:29+5:302020-03-28T14:50:36+5:30

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रतिबंधक उपाय म्हणून केंद्र व राज्य शासनाने लागू केलेल्या जमावबंदी व संचार बंदीच्या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने येत्या 14 एप्रिल पर्यंतच्या सर्व परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे

Savitribai Phule Pune University Exam postponed till 14th April | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा 14 एप्रिलपर्यंत स्थगित

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा 14 एप्रिलपर्यंत स्थगित

पुणे: कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रतिबंधक उपाय म्हणून केंद्र व राज्य शासनाने लागू केलेल्या जमावबंदी व संचार बंदीच्या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने येत्या 14 एप्रिल पर्यंतच्या सर्व परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे, असे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळ विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या पुणे, अहमदनगर व नाशिक या तीनही जिल्ह्यांमधील संलग्न महाविद्यालयांच्या व इतर शैक्षणिक संस्थांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. राज्य शासनाने येत्या 31 मार्चपर्यंत शाळा-महाविद्यालयांना सुट्टी देण्याचा निर्णय घेतला होता. त्यात कोरोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी येत्या 14 एप्रिलपर्यंत लॉकडाउन, संचारबंदी व जमावबंदीचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. परंतु, विद्यापीठाने परीक्षांबाबत कोणताही निर्णय जाहीर केला नव्हता. त्यामुळे विद्यापीठाने सर्व परीक्षा पुढे ढकलण्याबाबतचे परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. येत्या 14 एप्रिलनंतर कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेऊन परीक्षेसंदर्भातील माहिती सर्व संलग्न महाविद्यालयांना कळविली जाईल ,असे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे यांनी सांगितले.

Web Title: Savitribai Phule Pune University Exam postponed till 14th April