Savitribai Phule Pune University announces awards for teachers, principals and colleges | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून शिक्षक, प्राचार्य, महाविद्यालयांसाठीचे पुरस्कार जाहीर

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून शिक्षक, प्राचार्य, महाविद्यालयांसाठीचे पुरस्कार जाहीर

ठळक मुद्देया पुरस्कारांमध्ये बारा जणांचा समावेश

पुणे : सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठातर्फे दिल्या जाणाऱ्या उत्कृष्ट महाविद्यालय, प्राचार्य आणि शिक्षक पुरस्कारांची शुक्रवारी घोषणा करण्यात आली. या पुरस्कारांमध्ये बारा जणांचा समावेश आहे. विद्यापीठाच्या वर्धापनदिनी दि. १० फेब्रुवारी रोजी पुरस्कारांचे वितरण होणार आहे, अशी माहिती विद्यापीठ प्रशासनाकडून देण्यात आली.
विद्यापीठाने जाहीर केलेले पुरस्कार व्यावसायिक व अव्यावसायिक महाविद्यालयांसह शहरी व ग्रामीण महाविद्यालयांमध्ये विभागून दिले जातात. त्यानुसार शहरी विभागातील व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठीचा उत्कृष्ट महाविद्यालयाचा पुरस्कार पुण्यातील एआयएसएसएमएस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला, तर अव्यावसायिक अभ्यासक्रमांसाठीचा पुरस्कार नाशिकमधील एच. पी. टी. कला आणि आर. वाय. के. विज्ञान महाविद्यालयाला जाहीर झाला आहे. ग्रामीण भागातील पुरस्कार अनुक्रमे नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथील श्रीमान सुरेशदादा जैन कॉलेज ऑफ फार्मसी आणि संगमनेर येथील संगमनेर नगरपालिका कला, डी. जे. मालपाणी वाणिज्य आणि बी. एन. सारडा विज्ञान महाविद्यालयाने पटकाविला आहे.
अन्य पुरस्कार पुढीलप्रमाणे -
- उत्कृष्ट प्राचार्य (व्यावसायिक अभ्यासक्रम) शहरी विभाग : डॉ. नीरज व्यवहारे (डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसी, आकुर्डी, पुणे)
ग्रामीण विभाग : डॉ. रवींद्र खराडकर (जी. एस. रासयोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, वाघोरी, पुणे)
- उत्कृष्ट प्राचार्य (अव्यावसायिक अभ्यासक्रम) शहरी विभाग : डॉ. नितीन घोरपडे (बुबारावजी घोलप कॉलेज, सांगवी, पुणे)
ग्रामीण विभाग : डॉ. कुंडलिक शिंदे (आर. बी. नारायणराव बोरावके कॉलेज, श्रीरामपूर, जि. अहमदनगर)
- उत्कृष्ट शिक्षक (व्यावसायिक अभ्यासक्रम) शहरी विभाग : डॉ. दीप्ती पाटील (कमिन्स कॉलेज ऑ फ इंजिनिअरिंग फॉर गर्ल्स, कर्वेनगर, पुणे) आणि डॉ. मंगेश भालेकर (ए. आय. एस. एस. एम. एस. कॉलेज ऑफ फार्मसी, पुणे)
ग्रामीण विभाग : डॉ. माधुरी जावळे (संजीवनी कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग, कोपरगाव, जि. अहमदनगर)
- उत्कृष्ट शिक्षक (अव्यावसायिक अभ्यासक्रम) शहरी विभाग : डॉ. विवेक बोबडे (एच. पी. टी. कला व आर. वाय. के. विज्ञान महाविद्यालय, नाशिक)
ग्रामीण विभाग : डॉ. अरूण गायकवाड (संगमनेर नगरपालिका कला, डी. जे. मालपाणी वाणिज्य आणि बी. एन. सारडा विज्ञान महाविद्यालय, संगमनेर, जि. अहमदनगर)

Web Title: Savitribai Phule Pune University announces awards for teachers, principals and colleges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.