पुण्यात हेल्मेटविरोधी सविनय कायदेभंग रॅलीला सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2019 13:07 IST2019-01-03T11:10:50+5:302019-01-03T13:07:27+5:30

हेल्मेट सक्ती विरोधी कृती समितीतर्फे हेल्मेट सक्तीच्या निर्णयाविरोधात आणि दंडवसुलीविरोधात पुण्यातील गांजवे चौक ते पोलीस आयुक्त कार्यालयावर सविनय कायदेभंग रॅली काढण्यात आली.

savinay kaydebhang movement against helmets compulsory in pune | पुण्यात हेल्मेटविरोधी सविनय कायदेभंग रॅलीला सुरुवात

पुण्यात हेल्मेटविरोधी सविनय कायदेभंग रॅलीला सुरुवात

ठळक मुद्देहेल्मेट सक्ती विरोधी कृती समितीतर्फे हेल्मेट सक्तीच्या निर्णयाविरोधात आणि दंडवसुलीविरोधात पुण्यातील गांजवे चौक ते पोलीस आयुक्त कार्यालयावर सविनय कायदेभंग रॅली काढण्यात आली. वाहतूक पोलिसांनी मात्र आंदोलकांनी हेल्मेट न वापरल्याने रॅली सुरू असताना दंड करून इ-चलन फाडले.रॅलीच्या प्रारंभी समितीतर्फे सरकार व पोलीस प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

पुणे - हेल्मेट सक्ती विरोधी कृती समितीतर्फे हेल्मेट सक्तीच्या निर्णयाविरोधात आणि दंडवसुलीविरोधात पुण्यातील गांजवे चौक ते पोलीस आयुक्त कार्यालयावर सविनय कायदेभंग रॅली काढण्यात आली. यावेळी वाहतूक पोलिसांनी मात्र आंदोलकांनी हेल्मेट न वापरल्याने रॅली सुरू असताना दंड करून इ-चलन फाडले.

रॅलीच्या प्रारंभी समितीतर्फे सरकार व पोलीस प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. हेल्मेट सक्ती रद्द करा, पुणेकरांचे हाल, पोलीस झाले मालामाल, हेल्मेट हटाव पुणेकर बचाव अशा घोषणा देत समितीच्या कार्यकर्त्यानी सत्ताधारी व पोलीस प्रशासनाच्या धिक्काराच्या घोषणा दिल्या. या वेळी समितीचे अध्यक्ष सूर्यकांत पाठक, समन्वयक अंकुश काकडे, मोहन जोशी, रुपाली पाटील, धनंजय जाधव, मंदार जोशी आदी उपस्थित होते. या प्रसंगी समितीच्या कार्यकर्त्यांनी पुणेरी पगडी, फुले पगडी, शिंदेशाही पगडी, फेटे, गांधी टोपी परिधान करून निषेध नोंदविला.

Web Title: savinay kaydebhang movement against helmets compulsory in pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.