सावरकर मानहानी प्रकरण; फिर्यादी व बचाव पक्षाच्या विनंतीनुसार दोन्ही अर्जांना स्थगिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2026 09:36 IST2026-02-24T09:36:17+5:302026-02-24T09:36:48+5:30

राहुल गांधी यांचे वकील ॲड. मिलिंद दत्तात्रय पवार यांच्याकडून फिर्यादी सात्यकी सावरकर यांची उलट तपासणी चालू आहे.

Savarkar defamation case; Both applications stayed at the request of the prosecution and the defense | सावरकर मानहानी प्रकरण; फिर्यादी व बचाव पक्षाच्या विनंतीनुसार दोन्ही अर्जांना स्थगिती

सावरकर मानहानी प्रकरण; फिर्यादी व बचाव पक्षाच्या विनंतीनुसार दोन्ही अर्जांना स्थगिती

पुणे : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी लंडनमध्ये बदनामीकारक वक्तव्य केल्याप्रकरणी लोकसभेचे विरोधी पक्षनेते व खासदार राहुल गांधी यांना सक्षम अधिकारी अथवा न्यायशास्त्र प्रयोगशाळेसमोर (एफएसएल) त्यांच्या आवाजाचा नमुना देण्याचे निर्देश द्यावे असा केलेला अर्ज फिर्यादी सात्यकी सावरकर यांनी सध्या स्थगित ठेवण्याची विनंती करण्यात आल्याने आवाजाच्या नमुन्यावरील सुनावणीसह राहुल गांधी यांच्या वकिलांनी गोपनीय अहवाल न्यायालयात सादर करण्यासंबंधीचा अर्ज देखील स्थगित ठेवण्यात आला आहे. 

राहुल गांधी यांनी मार्च २०२३ मध्ये लंडनमधील अनिवासी भारतीयांसमोर भाषण करताना स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी बदनामीकारक विधान केले होते. त्यामुळे सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे. पुण्यातील एमपीएमएलए विशेष न्यायालयात या दाव्याची सुनावणी सुरू आहे. राहुल गांधी यांचे वकील ॲड. मिलिंद दत्तात्रय पवार यांच्याकडून फिर्यादी सात्यकी सावरकर यांची उलट तपासणी चालू आहे. फिर्यादी व राहुल गांधी यांच्या वकिलांनी अर्ज स्थगित ठेवण्याची विनंती केल्याने दोन्ही अर्ज स्थगित ठेवण्यात आले आहेत. या प्रकरणाची दि.१२ मार्च रोजी सुनावणी होणार आहे.

Web Title : सावरकर मानहानि मामला: अदालत के अनुरोध पर दोनों आवेदन स्थगित

Web Summary : सावरकर मानहानि मामले में राहुल गांधी के आवाज के नमूने के संबंध में अदालत ने वादी और बचाव पक्ष दोनों के अनुरोध के बाद कार्यवाही स्थगित कर दी। अगली सुनवाई 12 मार्च को है।

Web Title : Savarkar Defamation Case: Both Applications Adjourned by Court Request

Web Summary : The court adjourned proceedings regarding Rahul Gandhi's voice sample in the Savarkar defamation case, following requests from both the plaintiff and defense. The next hearing is on March 12th.