शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
2
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
3
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
4
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
5
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
6
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
7
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
8
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
9
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
10
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
12
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
13
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
14
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
15
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
16
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
17
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
19
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
20
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला

सासवड जेजुरी पुलाला भगदाड; बारामतीशी संपर्क तुटला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2019 9:49 AM

पुणे-बारामती रस्त्यावरील सासवड ते जेजुरी मार्गावरील पुलाला मोठे भगदाड पडल्याने पुणे-बारामती दरम्यानचा संपर्क तुटला आहे.

ठळक मुद्देपुणे-बारामती रस्त्यावरील सासवड ते जेजुरी मार्गावरील पुलाला मोठे भगदाड पडल्याने पुणे-बारामती दरम्यानचा संपर्क तुटला आहे. रात्रीपासून हा रस्ता बंद झाला आहे. दोन्ही बाजूला शेकडो वाहने अडकून पडली आहे.

पुणे - पुणे-बारामती रस्त्यावरील सासवड ते जेजुरी मार्गावरील पुलाला मोठे भगदाड पडल्याने पुणे-बारामती दरम्यानचा संपर्क तुटला आहे. पुणे बारामतीदरम्यान दररोज हजारो वाहने ये जा करत असतात. काल झालेल्या तुफान पावसाने सासवड गावातून जेजुरीकडे जाणाऱ्या स्मशानभूमीजवळील पुलाचा मोठा भाग तुटून पडला असून भगदाड पडले आहे. त्यामुळे रात्रीपासून हा रस्ता बंद झाला आहे. दोन्ही बाजूला शेकडो वाहने अडकून पडली आहे.

बारामतीला जाण्यासाठी जेजुरीहून मोरगाव मार्गे किंवा निरा मार्गे असे दोन रस्ते जातात. पण सासवडहून पुढे जेजुरीच्या मार्गावरील हा पुलाचा भाग कोसळल्याने संपूर्ण वाहतूक बंद पडली आहे. त्यामुळे आता बारामतीला जाण्यासाठी पुणे सोलापूर महामार्गावरुन पाटस मार्गे हा एकमेव रस्ता पुणे शहराशी जोडणारा राहिला आहे.

बारामतीला जाण्यासाठी हा जवळचा मार्ग होता. तो बंद पडल्याने यामुळे दररोज कामानिमित्त, व्यवसायानिमित्त बारामतीला जाणाऱ्या लोकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागणार आहे. पुण्याहून बारामतीसाठी दर 15 मिनिटांनी नॉन स्टॉप एस टी बस जाते. इतकी गर्दी या मार्गावर असते. त्याचवेळी पाटसमार्गे सर्व वाहतूक वळविण्यात येणार असल्याने या रस्त्यावर मोठा ताण येणार आहे.

पुरंदर तालुक्यामध्ये मध्यरात्री झालेल्या ढगफुटीचा फटका बारामती तालुक्याला बसला. पुरंधर भागात पडलेल्या मुसळधार पावसामुळे कऱ्हा नदीला 50 वर्षात प्रथमच महापूर आला आहे. पुरामुळे नदीकाठच्या अनेक गावांचा संपर्क तुटला असून कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पाण्याखाली गेले आहेत. नदीकाठच्या अनेक कुटुंबांना वेळेत सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. प्रशासनाच्या सतर्कतेमुळे मोठी जीवितहानी टळली आहे. नदीकाठच्या शेतीला मोठा फटका बसला आहे. तसेच हजारो विहिरी पाण्याखाली गेल्या आहेत. तालुक्यातील 15 हजार, बारामतीच्या 7 हजार 500 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याच्या हालचाली प्रशासनाने सुरू केल्या आहेत.

कऱ्हा नदीकाठी असणाऱ्या आंबी बु, आंबी खुर्द, मोरगाव, तरडोली, माळवाडी, बाबुर्डी,  जळगावकडे पठार, जळगाव सुपे आदी गावांमधील नदीकाठच्या नागरीकांना हलविण्यात आले आहे. पुरंदरमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे रात्री दीड वाजता पाण्याचा मोठा विसर्ग नाझरे धरणातून सुरू करण्यात आला. तत्पूर्वी प्रशासनाने रिक्षातून भोंगा लावून पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या.  

टॅग्स :PuneपुणेRainपाऊस