रस्त्याचे काम रखडल्याने सरपंचाचे अर्धनग्न आंदोलन;ठिय्या मांडत दिला उपोषणाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 15:14 IST2024-12-18T15:10:30+5:302024-12-18T15:14:36+5:30

वादग्रस्त ५० मीटरची जागा आहे ती जागा सोडून काम करण्याची सूचना करूनही ठेकेदाराने काहीच केले नाही.

Sarpanch's half-naked protest due to road work being stalled | रस्त्याचे काम रखडल्याने सरपंचाचे अर्धनग्न आंदोलन;ठिय्या मांडत दिला उपोषणाचा इशारा

रस्त्याचे काम रखडल्याने सरपंचाचे अर्धनग्न आंदोलन;ठिय्या मांडत दिला उपोषणाचा इशारा

मंचर : पिंपळगाव खडकी गावातील रस्त्याचे सिमेंट काँक्रीट काम रखडल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या गोष्टीला वाचा फोडण्यासाठी गावचे सरपंच दीपक पोखरकर यांनी चक्क कपडे काढून अर्धनग्न होत रस्त्यावर आंदोलन केले. रस्त्यावरच ठिय्या मांडला.

सदर काम चालू झाले नाही तर उपोषण करण्याचा इशारा सरपंच पोखरकर यांनी दिला आहे. तुकानांना चौक ते पिंपळगाव खडकी इतर जिल्हा मार्ग क्रमांक २४ या रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामासाठी माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सुमारे दीड कोटी रुपये मंजूर केले आहेत.

अंदाजपत्रक तयार होऊन बाकीच्या परवानगी होऊन रस्त्याचं काम चालू झालं असून रस्ता कॉक्रिटीकरणाचा होणार आहे. त्याच्यानंतर रस्त्याला गावात चढ होता तो कमी केला जाणार आहे, त्यामुळे जवळजवळ आठ फुटाचे खोदकाम एक किलोमीटरच्या पॅसेजमध्ये करण्यात आले.

रस्त्यातील संपूर्ण माती मोकळी झाली. एक-दोन नागरिकांनी हरकती घेतल्यामुळे काम बंद झाले आहे. संबंधित नागरिकांवर शासकीय कामांमध्ये अडथळा आणल्याच्या कारणाने गुन्हा दाखल करण्याच्या संदर्भात ग्रामपंचायतने पत्र पोलिस स्टेशनला दिले. परंतु पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणणं असं आलं की, हा रस्ता इतर जिल्हा मार्ग म्हणजे जिल्हा परिषदेच्या मालकीचा आहे. तर जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करूनही कुठलीही हालचाल झाली नाही

परिणामी गेली एक-दीड महिन्यापासून काम बंद आहे. रस्त्यावर माती तयार झाल्यामुळे प्रचंड प्रमाणात धूळ आणि फुफाटा तयार झाला आहे. दिवसभर धुळीचा साम्राज्य असल्याने लोकांना अक्षरशः श्वास घेण्यास अडचणी येत आहेत. थंडीचे दिवस असल्याने चौकामध्ये लोक उभे राहू शकत नाही, अशी परिस्थिती आहे. संबंधित ठेकेदाराला पाणी मारण्यास सांगितले तर तो उडवाउडवीची उत्तर देतो.

वादग्रस्त ५० मीटरची जागा आहे ती जागा सोडून काम करण्याची सूचना करूनही ठेकेदाराने काहीच केले नाही. त्यामुळे संतप्त झालेले सरपंच दीपक पोखरकर यांनी सकाळी कडाक्याच्या थंडीत कपडे उतरवून आंदोलन केले. या अर्धनग्न आंदोलनाला ग्रामस्थांनी पाठिंबा दिला आहे. काम लवकर चालू झाले नाही तर उपोषण करण्याचे निवेदन सरपंच पोखरकर यांनी प्रशासनाला दिले आहे. 

Web Title: Sarpanch's half-naked protest due to road work being stalled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.