शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

सरपंच ते आमदार! बापूसाहेब पठारे पुन्हा वडगाव शेरीच्या रिंगणात; महायुतीचा उमेदवार ठरेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2024 21:02 IST

२००९ मध्ये राष्ट्रवादी पक्षाकडून आमदार झाले. काही कारणास्तव मधल्या काळात ते एक निवडणुकापासून लांब राहिले.

पुणे - राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची उमेदवारी यादी आज प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीर केली. ४५ जणांच्या या यादीत जवळपास सर्वच प्रमुख मतदारसंघात उमेदवारी देण्यात आली आहे. बहुचर्चित अशा वडगाव शेरी मतदारसंघातून अखेर बापूसाहेब पठारे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सरपंच ते आमदार असा प्रवास राहिलेले बापूसाहेब पठारे या निमित्ताने पुन्हा एकदा वडगाव शेरीच्या निवडणूक रिंगणात उतरले आहेत. 

खराडीच्या सरपंच पदापासून बापूसाहेब पठारे यांचा राजकीय प्रवास सुरू झाला. नंतर ते पंचायत समिती, जिल्हापरिषद सदस्य आणि पुणे महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले. नगरसेवक असताना त्यांनी स्थायी समितीचे अध्यक्ष पद देखील भूषवले. त्यानंतर २००९ मध्ये राष्ट्रवादी पक्षाकडून आमदार झाले. काही कारणास्तव मधल्या काळात ते एक निवडणुकापासून लांब राहिले. या काळात त्यांनी भारतीय जनता पक्षातही प्रवेश केला. मात्र आता पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात त्यांनी प्रवेश केला असून यंदा ते विधानसभेच्या रिंगणात आहे. 

दरम्यान उमेदवारी जाहीर होताच बापू पठारे यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले, शरद पवारांनी यापूर्वी देखील माझ्यावर विश्वास व्यक्त केला होता आणि आत्ता देखील माझ्यावर विश्वास व्यक्त केला आहे. वडगांव शेरी मतदार संघातील जनतेचाही माझ्यावर विश्वास आहे. त्यामुळे यंदा वडगाव शेरीतून आमदार मीच असेल असा विश्वासही त्यांनी बोलताना व्यक्त केला. बापूसाहेब पठारे वडगाव शेरी मतदार संघाची निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावर असेल असेही स्पष्ट केले. मागील दहा वर्षात वडगाव शेरीतील नागरिकांची कसे हाल झाले याकडे त्यांनी लक्ष वेधले. वडगाव शेरी मतदारसंघात वाहतूक कोंडीचा ज्वलंत प्रश्न असून तो सोडविण्यावर भर असेल असेही त्यांनी स्पष्ट केले. 

विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांनी बोलताना आतापर्यंत वडगाव शेरी मतदारसंघात सर्वाधिक निधी मी चांगला असा दावा केला होता. यावर उत्तर देताना बापूसाहेब पठारे म्हणाले, त्यांनी आणलेला निधी फक्त कागदावर आहे. मतदार संघात तो कुठेही दिसत नाही. एवढा निधी आणला तर तो गेला कुठे असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. मागील काही वर्षात मतदार संघात म्हणावी तशी विकास कामे झाली नाहीत. त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. त्यामुळे त्रस्त झालेले नागरिक नक्कीच बदल घडवतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४vadgaon-sheri-acवडगाव शेरीSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसMahayutiमहायुतीBJPभाजपाAjit Pawarअजित पवार