शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

कोरेगाव भीमा येथे सरपंच, ग्रामसेवकावर मनमानी कारभाराचा आरोप, सदस्यांचा उपोषणाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2024 12:34 IST

१ जानेवारीच्या आदल्या दिवशी नऊ सदस्य उपोषणाला बसणार असल्याने याबाबत गटविकास अधिकारी काय भूमिका घेतात हे पाहावे लागेल

कोरेगाव भीमा : कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील ग्रामपंचायतचे सरपंच व ग्रामसेवक हे सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी कारभार करत मासिक सभेत हजर नसलेल्या सदस्याच्या नावे ठराव करत असल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणात उपसरपंचांसह नऊ सदस्यांनी मासिक मिटिंगवर बहिष्कार टाकत सरपंच व ग्रामसेवकांवर कारवाईची मागणी करत उपोषणाचा इशारा दिला आहे.            कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील ग्रामपंचायतचे सरपंच संदीप ढेरंगे व ग्रामविकास अधिकारी श्रीकांत वाव्हळ यांनी मागील मासिक सभेत विकास कामांचा ठराव झाला नसताना मनमानी करत त्या कामांना मंजुरी देत प्रोसेडिंग मध्ये टाकले. याबाबत उपस्थित सदस्यांनी बहुमताने कोणतेही नवीन काम करायचे नाही असे ठरले असताना सरपंच व ग्रामसेवकांनी कामे टाकली. तसेच न ठरलेली कामे देखील प्रोसेडिंग मध्ये मांडताना सभेत हजर नसलेल्या सदस्याचे नाव सूचक म्हणून टाकल्याचा तसेच दोघे संगनमताने कोणालाही विश्वासात न घेता एकाच वार्डात जास्त कामे करत असल्याचा आरोप करण्यात आला. उपसरपंच सविता घावटे, माजी सरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य विक्रम गव्हाणे, केशव फडतरे, अनिकेत गव्हाणे, गणेश कांबळे, शिल्पा फडतरे, मनीषा गव्हाणे, शैला फडतरे, अर्चना सुपेकर यांनी आज होणाऱ्या मासिक मिटिंगवत बहिष्कार टाकला आहे. सरपंच व ग्रामसेवक हे मनमानी करत असल्याचा आरोप करत गटविकास अधिकारी व उपकार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदन देत सरपंच व ग्रामसेवकांवर कारवाईची मागणी करत उपोषणाचा इशारा दिला आहे. १ जानेवारीच्या आदल्या दिवशी नऊ सदस्य उपोषणाला बसणार असल्याने याबाबत गटविकास अधिकारी काय भूमिका घेतात हे पाहावे लागेल. कोरेगाव भीमा ग्रामपंचायतच्या मासिक मिटिंग साठी सतरा पैकी फक्त पाच सदस्य हजर असल्याने मिटिंग तहकूब केली आहे सभाशास्त्रा प्रमाणे सदर सदस्यांनी ३१ डिसेंबर च्या तहकूब सभेत हजर राहून आपले मत मांडावे असे आवाहन सरपंच संदीप ढेरंगे यांनी केले.

टॅग्स :PuneपुणेBhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचारsarpanchसरपंचgram panchayatग्राम पंचायतagitationआंदोलनShirurशिरुर