संत तुकाराम महाराजांची पालखी पुण्यात 'या' ठिकाणी जास्त वेळ थांबणार; नेमकं कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 15:50 IST2025-06-11T15:50:40+5:302025-06-11T15:50:52+5:30

संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे यंदा १८ जूनला होणार आहे

Sant Tukaram Maharaj palakhi will stay at this place in Pune for a longer time; What is the exact reason? | संत तुकाराम महाराजांची पालखी पुण्यात 'या' ठिकाणी जास्त वेळ थांबणार; नेमकं कारण काय?

संत तुकाराम महाराजांची पालखी पुण्यात 'या' ठिकाणी जास्त वेळ थांबणार; नेमकं कारण काय?

औंध : बोपोडी वासीयांना यंदा संत तुकोबा महाराजांच्या पालखीचे दर्शन अधिक वेळ घेता येणार असून, त्यासाठी पालखी यंदा बोपोडीत २० ते २५ मिनिटे अधिक वेळे थांबणार असल्याची माहिती हभप जालिंदर महाराज मोरे यांनी दिली.

संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे यंदा १८ जूनला होणार आहे. प्रत्येक वर्षीप्रमाणे पालखी मार्गावर बोपोडी येथे संत तुकाराम महाराजांची पालखी फार कमी वेळ थांबत असल्याने, खडकी, औंध, बोपोडी, बाणेर, रेंजहिल्स परिसरातील असंख्य भाविकांना तुकाराम महाराजांच्या पालखीचे दर्शन घेता येत नाही. ही अडचण लक्षात घेता, पुणे शहराच्या माजी उपमहापौर सुनीता वाडेकर यांनी संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष हभप जालिंदर महाराज मोरे यांची भेट घेऊन पालखी बोपोडीतील विसाव्याच्या ठिकाणी किमान वीस मिनिटे अधिक थांबवावी, अशी विनंती करणारे निवेदन देण्यात आले.

या विनंतीला मान देऊन हभप जालिंदर महाराज मोरे यांनी तुकोबारायांची पालखी बोपोडी येथे २० ते २५ मिनिटे अधिक वेळ थांबेल, असे आश्वासन त्यांना दिले. यामुळे परिसरातील हजारो भाविकांना वेळेत आणि शांततेत दर्शन घेण्याची संधी मिळणार आहे, ही अत्यंत आनंदाची समाधानाची बाब आहे.

यावेळी संस्थानच्या वतीने माजी उपमहापौर सुनीता वाडेकर यांचा सन्मान करण्यात आला. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते परशुराम वाडेकर, अविनाश कदम, ॲड.ज्ञानेश जावीर आणि इतर पदाधिकारी, भाविक या निर्णयामुळे पालखी सोहळ्याचा पुणे शहरातील विसावा अधिक आध्यात्मिक, भक्तिपर आणि जनसामान्यांसाठी सुलभ होईल. संत तुकाराम महाराजांचा कीर्तन परंपरेचा संदेश, वारकऱ्यांचा भक्तिभाव आणि वारीची परंपरा अशा स्वरूपात आणखी भव्य आणि लोकाभिमुख होईल, असा विश्वास माजी उपमहापौर सुनीता वाडेकर यांनी व्यक्त केला.

Web Title: Sant Tukaram Maharaj palakhi will stay at this place in Pune for a longer time; What is the exact reason?