शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
2
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
3
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
4
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
5
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
6
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
7
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
8
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
9
पाकिस्तानला T20 World Cup साठी संघ जाहीर करण्याचा मुहूर्त सापडला; तरीही गडबड केलीच
10
राजस्थान रॉयल्सने केले 'Boult' टाईट, पण सनरायझर्स हैदराबादने दाखवला 'Klaas'en! 
11
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
12
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
13
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
14
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
15
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
16
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
17
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
18
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
19
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
20
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री

भांडारकर संस्थेत रंगणार  ‘संत तुकाराम’ महोत्सव

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2020 12:10 PM

४० चित्रे व शिल्पे ‘संत तुकाराम’ महोत्सवादरम्यान आयोजित चित्रप्रदर्शनात मांडली जाणार

ठळक मुद्दे व्याख्याने, परिसंवाद, भजन-कीर्तन, चित्रप्रदर्शन यांसारखे विविध कार्यक्रम

पुणे : भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संत ज्ञानदेव, संत नामदेव आणि संत तुकाराम अध्यासन यांच्या वतीने ‘संत तुकाराम’ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. तुकोबा आणि प्रार्थना समाज यांच्यावरील व्याख्याने, परिसंवाद, भजन-कीर्तन, चित्रप्रदर्शन अशा विविध कार्यक्रमांमधून हा महोत्सव रंगणार आहे.  तुकाराम बीजेच्या निमित्ताने येत्या १३ ते १५ मार्चदरम्यान भांडारकर संस्थेत होणाऱ्या या महोत्सवाच्या उद्घाटनासह विख्यात चित्रकार भास्कर हांडे यांच्या तुकोबांच्या अभंगांवरील चित्रप्रदर्शनाचेदेखील उपमहापौर सरस्वती शेंडगे यांच्या हस्ते उद्घाटन होणार असल्याची माहिती संत नामदेव अध्यासनाचे प्रमुख डॉ. सदानंद मोरे यांनी दिली. या वेळी संत ज्ञानदेव अध्यासनाचे प्रमुख प्रा. मुकुंद दातार, संत तुकाराम अध्यासनाचे प्रमुख डॉ. अभय टिळक, भांडारकर संस्थेचे सचिव प्रा. सुधीर वैशंपायन व कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष डॉ. भूपाल पटवर्धन हे उपस्थित होते.  उद्घाटन सत्रानंतर संत तुकाराम अध्यासनाचे प्रमुख डॉ. अभय टिळक यांचे   ‘श्री तुकाराम चरित्र’ व ‘संत तुकाराम आणि प्रार्थना समाज’ या विषयावर डॉ. सदानंद मोरे यांचे व्याख्यान होईल. शनिवारी (दि. १४) दुपारी ३ वाजता प्रा. डॉ. दिलीप धोंडगे ‘प्रार्थना समाजाचे तुकाराम चर्चा मंडळ’ या विषयावर विचार व्यक्त करणार असून, त्यानंतर डॉ. दिलीप जोग व डॉ. सुषमा जोग आणि सहकारी यांचे ‘प्रार्थना संगीत’ सादर होईल. रविवारी (दि. १५)  दुपारी ३ वाजता ‘संत आणि समकालीन परिवर्तने’ या विषयावर परिसंवाद होणार असून त्यामध्ये डॉ. रूपाली शिंदे, सचिन पवार आणि राजा अवसक हे सहभागी होतील. या परिसंवादाचे अध्यक्षस्थान डॉ. राजा दीक्षित भूषविणार आहेत. त्यानंतर नमिता मुजुमदार यांच्या ‘हरिकीर्तनाने’ या संत तुकाराम महोत्सवाचा समारोप होईल. हे कीर्तन भांडारकरमधील जुन्या पिंपळ्याच्या झाडाखाली रंगणार आहे.  ..........मी तीस वर्षांपूर्वी ’तुझे रूप माझे देणे’ हा संत तुकाराम महाराजांच्या अभंगावरील चित्र आणि शिल्पांचा एक प्रकल्प हाती घेतला होता. त्यामध्ये जवळपास ४०० चित्रे मी रेखाटली. या चित्रांचे १९९२मध्ये पहिले प्रदर्शन हॉलंडमध्ये भरले होते. त्यानंतर विविध ठिकाणी हे चित्रप्रदर्शन भरविण्यात आले होते. यामधील  ४० चित्रे व शिल्पे ‘संत तुकाराम’ महोत्सवादरम्यान आयोजित चित्रप्रदर्शनात मांडली जाणार आहेत. ही सर्व मराठी शैलीतील चित्रे असून, त्यातील काही शिल्पे औंधच्या  ‘वैश्विक कला आणि पर्यावरण कलादालनात ठेवण्यात आली आहेत. पुण्यात या चित्रांसाठी कायमस्वरूपी कलादालन व्हावे, अशी इच्छा चित्रकार भास्कर हांडे यांनी व्यक्त केली..........तत्त्वज्ञान हा प्रार्थना समाजाचा पाया... डॉ. रामकृष्ण गोपाल भांडारकर हे विख्यात प्राच्यविद्या तज्ज्ञ, संस्कृतचे गाढे विद्वान तसेच प्रार्थना समाज या महत्त्वाच्या धार्मिक चळवळीचे अध्वर्यू होते. संत तुकाराम महाराज आणि त्यांचे तत्त्वज्ञान हा प्रार्थना समाजाचा पाया होता. डॉ. भांडारकर तुकोबांना गुरुस्थानी मानत. - डॉ. सदानंद मोरे, संत नामदेव अध्यासनाचे प्रमुख, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

टॅग्स :Puneपुणेsant tukaramसंत तुकारामbhandarkar institute puneभांडारकर संशोधन संस्था, पुणे