शहरं
Join us  
Trending Stories
1
'धनुष्य बाण' कुणाचा, उद्धवसेना की शिंदेसेना? १६ जुलैला 'सुप्रीम' सुनावणी
2
"सर्वाधिक पोलीसमृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने"; विरोधी पक्षनेते दानवेंनी मांडली आकडेवारी
3
'मीच मुख्यमंत्री राहणार', सिद्धारमय्या यांची स्पष्टोक्ती; डीके शिवकुमार म्हणाले- "आता पर्याय...'
4
शाळेपासून होतं प्रेम, भेटण्यासाठी गेस्ट हाऊसमध्ये बोलावलं, शरीरसंबंध ठेवले आणि अखेर तिच्यावर सपासप वार केले  
5
Viral Video : ५ वर्षांची लेक समुद्रात पडली; वाचवण्यासाठी पित्याने थेट पाण्यात उडी घेतली! पुढे काय झाले बघाच... 
6
Share Market Update: शेअर बाजारात मोठी घसरण; Sensex ४०० अंकांपेक्षा अधिक आपटला, निफ्टीही घसरला
7
अनिल अंबानींच्या कंपनीचं लोन अकाऊंट ठरणार फ्रॉड; देशातील सर्वात मोठ्या बँकेची कारवाई
8
रेल्वे तिकीट बुकिंगवर परिणाम दिसू लागला! बराच वेळ झाला तरी तत्काळ तिकीटे उपलब्ध होती...
9
गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरुलीलामृत पारायण सप्ताह करा; स्वामींची कायम कृपा, कालातीत अखंड लाभ
10
लोकसभा, विधानसभा झाली आतातरी निवडणूक चिन्हावर सुनावणी घ्या...; उद्धव ठाकरेंना का हवाय धनुष्यबाण...
11
प्रेमासाठी बदललं जेंडर, पती निघाला फ्रॉड, पैसे-प्रॉपर्टीचा होता लालची, ट्रांसजेंडर अभिनेत्रीचा खुलासा
12
कळव्यातील महिलेच्या हत्येचं कोडं सुटलं, ४० हजार...; बिहारमधून दोघांना अटक, अल्पवयीन मुलाचाही समावेश
13
विरोधकांनी शेतकरी प्रश्नांच्या आडून राजकारण करू नये, चर्चा करण्यास केव्हाही तयार: अजित पवार
14
चमचमीत खायला आवडतं पण पावसाळ्यात थांबा; छोटासा निष्काळजीपणा अन् आजारांना आमंत्रण
15
आपल्या डोक्यात हवा गेली होती, म्हणूनच...; 'राशीचक्र'कार शरद उपाध्ये यांचं निलेश साबळेला खुलं पत्र
16
विक्री घटली! जूनमध्ये टाटा, मारुती, ह्युंदाईच्या गोटात हाहाकार उडाला; महिंद्रा, एमजीने झेंडा रोवला...
17
पुढील शंभर वर्षांचा विचार करून नियोजित वेळेत प्रकल्प पूर्ण करा; DCM अजित पवारांचे निर्देश
18
धक्कादायक! गर्लफ्रेंडने भेटायला बोलवलं अन् बॉयफ्रेंडचा प्रायव्हेट पार्टच कापला; कशावरून झाला वाद?
19
तरुण-तरुणी तर्राट, स्कॉर्पियो सुसाट, रस्ता सोडून थेट घरात घुसली गाडी
20
लिस्ट होताच गुंतवणूकदारांकडून शेअरची विक्री; पहिल्याच दिवशी केलं मोठं नुकसान, ₹६९ वर आली किंमत

Pandharpur Wari 2025: संत मुक्ताबाई पालखी सोहळ्याचे पंढरपूरकडे प्रस्थान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 19:28 IST

पालखी सोहळ्याचे हे सातवे वर्ष असून पालखीसोबत मोठ्या संख्येने महिला भक्त सहभागी झालेल्या आहेत

निमगाव केतकी: शेळगाव येथून पंढरपूर कडे निघालेल्या श्री.संत मुक्ताबाई पालखी सोहळ्याचे निमगाव केतकी येथे फटाक्यांच्या आतषबाजीत मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. पालखी सोहळ्याचे हे सातवे वर्ष असून पालखीसोबत मोठ्या संख्येने महिला भक्त सहभागी झालेल्या आहेत.

दरम्यान शुक्रवारी दि. १ जुलै रोजी सकाळी मुक्ताबाईचा पालखी सोहळा शेळगाव येथील संत मुक्ताबाई मंदिरापासून विठ्ठल नामाचा जयघोष करत पंढरपूरकडे मार्गस्थ झाला. सकाळी ८ वा. संत मुक्ताबाई मंदिरात सरपंच उर्मिला शिंगाडे आणि छत्रपती साखर कारखान्याचे संचालक ॲड.लक्ष्मणराव शिंगाडे यांच्या हस्ते संत  मुक्ताबाईची आरती संपन्न झाली. यावेळी माऊली चौरे, मोहन खराडे, मा.जि.प.स विठ्ठल जाधव, राहुल जाधव, नानासो जाधव, भिवा जाधव यांच्यासह पालखी सोहळा कमिटी सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.  माजी वरिष्ठ पोलीस अधिकारी राजकुमार कोथमीरे यांच्या शुभहस्ते पालखी रथाला श्रीफळ फोडून पालखी सोहळा पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाला. यावेळी श्री संत मुक्ताबाई मंदिर परिसर विठ्ठल नामाच्या जयघोषाने दुमदुमून निघाला.

पालखी सोहळा सुवर्णयुग गणेश मंदिराजवळ आल्यानंतर  पालखी सोहळ्याचे प्रमुख ह.भ.प प्रकाश महाराज साठे यांचा सुवर्णयुग गणेश मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष मच्छिंद्र चांदणे यांनी फेटा बांधून स्वागत केले. यावेळी तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष दत्तात्रय चांदणे, माजी उपसरपंच सचिन चांदणे, दशरथ बनकर, भीमराव बोराटे, मधुकर भोंग, माणिक ननवरे, शिवाजी यादव आदी उपस्थित होते.     निमगाव केतकी येथील श्री संत सावतामाळी चौक या ठिकाणी पालखी सोहळा आल्यानंतर गावातील भजनी मंडळासह ग्रामस्थांच्या वतीने अष्टविनायक पतसंस्थेचे चेअरमन तथा माजी सभापती देवराज जाधव व माजी सभापती अंकुश जाधव, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तुषार जाधव, सोनाली जाधव, रामचंद्र हेगडे, पांडुरंग हेगडे, संदीप भोंग, रणजीत भोंग,ॲड. सुभाष भोंग ॲड.संदीप शेंडे, जनार्दन बनकर सिकंदर मुलाणी धनंजय राऊत तसेच ग्रामस्थांनी मोठ्या भक्ती भावाने पालखी सोहळ्याचे स्वागत केले.

दुपारच्या विसाव्यासाठी व भोजनासाठी पालखी सोहळा श्री संत सावता माळी मंदिर या ठिकाणी विसावला यावेळी पालखी प्रमुख ह भ प प्रकाश महाराज साठे यांचा सत्कार श्री संत सावतामाळी ट्रस्टचे अध्यक्ष भानुदास राऊत, दादाराम शेंडे, मारुती भोंग,मंगेश भोंग, सागर ढगे, संदीप शेंडे यांच्या हस्ते करण्यात आला. पालखी सोहळ्या सोबत आलेल्या सर्व वैष्णवभक्तांना देवराज  जाधव यांच्या वतीने अन्नदान करण्यात आले. यावेळी प्रशांत बंडगर, वैभव मोरे, नंदकुमार गोरे, अजित ननवरे, आजिनाथ शेंडे, पांडुरंग, दिनेश घाडगे तसेच ग्रामस्थ व पतसंस्थेचे सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :ashadhi wariआषाढी एकादशी वारी 2025PandharpurपंढरपूरAshadhi Ekadashiआषाढी एकादशी २०२५sant dnyaneshwarसंत ज्ञानेश्वर