आमच्यावरील ED च्या धाडीबाबत 2024 नंतर उत्तर देऊ - संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2022 18:49 IST2022-06-04T18:46:39+5:302022-06-04T18:49:39+5:30

महाराष्ट्र कधीही झुकणार नाही....

Sanjay Raut said Lets answer about EDs raid after 2024 pune latest news | आमच्यावरील ED च्या धाडीबाबत 2024 नंतर उत्तर देऊ - संजय राऊत

आमच्यावरील ED च्या धाडीबाबत 2024 नंतर उत्तर देऊ - संजय राऊत

पुणे : सध्या महाविकास आघाडीचं काम व्यवस्थित सुरू आहे.  महाविकास आघाडी लोकांच्या प्रश्नांसाठी लढत आहे. बृजभुषण मॅनेज होतील असे, व्यक्ती नाहीत, असं वक्तव्य शरद पवार यांनी पुण्यातील महाराष्ट्र कनेक्ट कार्यक्रमावेळी केले. यावेळी शिवसेनेचे संजय राऊत तसेच काँग्रेसचे सचिन सावंतही स्टेजवर होते. राऊत यावेळी बोलतना म्हणाले, ईडीच्या बाबतीत आम्ही 2024 नंतर उत्तर देऊ. राऊतांच्या या वक्तव्यानंतर सभागृहात एकच हशा पिकली.

पुढे बोलताना पवार म्हणाले, सध्याचे महाविकास आघाडी सरकार त्यांचा कार्यकाल पूर्ण करेल. मविआ जनतेच्या कामासाठी एकत्र काम करत आहे. सध्याचे राजकारणी सभ्य, सुसंस्कृत नसल्याचेही शरद पवार म्हणाले.

आपला रुपय्या सच्चा आहे, त्यामुळे घाबरण्याचे कारणच नाही. सध्या जाणीवपूर्वक जातीवाद पेरला जातोय, असंही पवार म्हणाले.

संजय राऊत काय म्हणाले?
- भाजपने दिलेला शब्द पाळला नाही. 
-माझी नसलेली प्रॉपर्टी जप्त केलीय.
- महाराष्ट्र कधीही झुकणार नाही.
- देशातील महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा होत नाही.
- देशातील गृहमंत्री सिनेमाचे प्रमोशन करण्यात व्यस्त
- चीनच्या ताब्यातील कैलास मानस सरोवर परत आणा
- ईडीच्या धाडीबाबत 2024 नंतर उत्तर देऊ

Web Title: Sanjay Raut said Lets answer about EDs raid after 2024 pune latest news