पुणे-नाशिक महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत सांबर मृत्युमुखी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2023 08:46 PM2023-11-03T20:46:46+5:302023-11-03T20:47:28+5:30

मंचर ( पुणे ) : आंबेगाव तालुक्यातील कळंब येथील वर्पे मळा परिसरात पुणे - नाशिक महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत ...

Sambar died in a collision with an unknown vehicle on the Pune-Nashik highway | पुणे-नाशिक महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत सांबर मृत्युमुखी

पुणे-नाशिक महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत सांबर मृत्युमुखी

मंचर (पुणे) : आंबेगाव तालुक्यातील कळंब येथील वर्पे मळा परिसरात पुणे - नाशिक महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत सांबर या वन्यप्राण्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे ते मृत्युमुखी पडले आहे. कळंब येथील वर्पेमळा येथून जाणाऱ्या पुणे - नाशिक महामार्गावर आज पहाटेच्या दरम्यान अज्ञात वाहनाच्या धडकेत सांबर हा वन्यप्राणी गंभीर जखमी झाला होता, ही माहिती स्वप्निल भालेराव यांनी वनपाल शशिकांत मडके यांना दिली. तात्काळ वनविभागाचे कर्मचारी व रेस्क्यू सदस्य घटनास्थळी हजर होऊन जखमी सांबर या वन्यप्राण्याला उपचारासाठी घेऊन जात असताना मृत्युमुखी पडले.

दरम्यान, कळंब वनविभाग परिसरात बिबट्याचे मोठ्या प्रमाणावर नागरिकांना दर्शन होत असते. त्याचबरोबर अनेक पाळीव जनावरांवर हल्लेदेखील बिबट्याने केलेले आहेत. मात्र सांबर हे वन्यप्राणी या परिसरात पहिल्यांदाच आढळून आले होते. या सांबराच्या मृत्यूने या परिसरातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली.

Web Title: Sambar died in a collision with an unknown vehicle on the Pune-Nashik highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.