Somnath Bharti : "पंतप्रधान मोदी स्वबळावर जिंकले नाहीत..."; 'मुंडन' करण्याच्या शपथेवर आप नेत्याचा यू-टर्न

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2024 10:54 AM2024-06-10T10:54:58+5:302024-06-10T11:02:49+5:30

AAP Somnath Bharti And Narendra Modi : सोमनाथ भारती यांनी नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास मुंडन करू, अशी शपथ घेतली होती, मात्र आता त्यांनी दिलेलं आश्वासन पूर्ण करण्यास नकार दिला आहे.

AAP Somnath Bharti takes u turn his promise shave off heads Narendra Modi did not win on his own | Somnath Bharti : "पंतप्रधान मोदी स्वबळावर जिंकले नाहीत..."; 'मुंडन' करण्याच्या शपथेवर आप नेत्याचा यू-टर्न

Somnath Bharti : "पंतप्रधान मोदी स्वबळावर जिंकले नाहीत..."; 'मुंडन' करण्याच्या शपथेवर आप नेत्याचा यू-टर्न

आम आदमी पक्षाचे नेते सोमनाथ भारती यांनी नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास मुंडन करू, अशी शपथ घेतली होती, मात्र आता त्यांनी दिलेलं आश्वासन पूर्ण करण्यास नकार दिला आहे. नरेंद्र मोदींची तिसरी टर्म ही त्यांची एकट्याची नसून एनडीएच्या मित्रपक्षांच्या संयुक्त प्रयत्नांचं फळ असल्याचं म्हटलं आहे.

पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, सोमनाथ भारती म्हणाले की, "मी म्हणालो होतो की, मोदी  तिसऱ्यांदा निवडून आल्यास मुंडन करेन. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वबळावर जिंकलेले नाहीत, त्यांनी युतीच्या पाठिंब्यावर निवडणूक जिंकली आहे"

"मी माझ्या शब्दावर ठाम आहे, पण ते स्वबळावर जिंकले नाहीत, त्यामुळे हा त्यांचा विजय नाही. म्हणूनच मी म्हटल्याप्रमाणे जर ते स्वतंत्रपणे जिंकले असते तर मी माझं मुंडन केलं असतं" असं म्हटलं आहे. सोमनाथ भारती सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर निकाल जाहीर होण्यापूर्वी नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर मी मुंडन करेन असं म्हटलं होतं. 

"नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर मी मुंडन करेन. माझे हे शब्द लक्षात ठेवा. ४ जून रोजी सर्व एक्झिट पोल चुकीचे सिद्ध होतील आणि मोदीजी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार नाहीत. दिल्लीतील सातही जागा इंडिया आघाडी जिंकेल. मोदीजींच्या भीतीमुळे एक्झिट पोल त्यांना पराभूत झाल्याचे दाखवू देत नाहीत. त्यामुळे आपल्या सर्वांना ४ जूनला निकालाची वाट पाहावी लागेल. जनतेने भाजपाच्या विरोधात प्रचंड मतदान केलं आहे" असं सोमनाथ यांनी म्हटलं होतं. 
 

Web Title: AAP Somnath Bharti takes u turn his promise shave off heads Narendra Modi did not win on his own

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.