शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींना जिरेटोप घातल्याने वादंग; टीकेनंतर प्रफुल्ल पटेलांनी शिवप्रेमींना दिला 'हा' शब्द
2
निवडणूक प्रचारात कांद्यासाठी आंदोलनाची घोषणा; पण लंकेंनी आता शेतकऱ्यांना केलं नवं आवाहन!
3
"आमच्या घरी ईद साजरी केली जायची"; पंतप्रधान मोदींनी सांगितला मुस्लिम शेजाऱ्यांचा किस्सा
4
सत्तापिपासून भाजपा मृतदेहांवरून रॅली काढतंय का? मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून काँग्रेसचा जळजळीत सवाल
5
'नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा नक्कीच पंतप्रधान होतील, आम्हालाही त्यांच्यासारख्या नेत्याची गरज; पाकिस्तानी अब्जाधीशांनी केले कौतुक
6
Kangana Ranaut : "तुम्ही मला एकदा मारलंत तर अनेक वेळा..."; कंगना राणौतचं विक्रमादित्य सिंहांवर टीकास्त्र
7
'अनिल कपूरसारखा पती नको' असं का म्हणाली होती माधुरी दीक्षित? इंटरेस्टिंग आहे यामागचं कारण
8
Gemology: भाग्यरत्न घातल्याने खरोखरंच भाग्य बदलते का? कोणत्या रत्नाचा काय प्रभाव पडतो जाणून घ्या!
9
राज ठाकरेंच्या पाठिंब्यानं महायुतीला बळ; भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे 'शिवतीर्थ'वर
10
Video - ना स्ट्रेचर, ना कोणाची मदत; आजारी वडिलांना उचलून घेऊन रुग्णालयात फिरत राहिला लेक
11
सूर्यावर भीषण स्फोट; ISROच्या आदित्य L-1 आणि चांद्रयान-2 च्या कॅमेऱ्यात कैद
12
IPL मुळे भारताच्या वाट्याला T20 WC पूर्वी १ सराव सामना; दोन बॅचमध्ये संघ अमेरिकेला जाणार
13
सांगलीच्या निर्णयात घाई केली; भाजपा प्रवेशाबाबत विश्वजित कदमांचं मोठं विधान
14
SBI'ने ग्राहकांना दिली भेट! एफडीवरील व्याजदरात केली मोठी वाढ, पाहा नवे दर
15
प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला; "तुमच्याकडे कुठली वॉशिंग मशिन..."
16
Corona Virus : चिंताजनक! भारतात आला कोरोनाचा नवा व्हेरिएंट; 'ही' आहेत लक्षणं, लोकांसाठी किती धोकादायक?
17
तुमच्या स्मार्टफोनसाठी कोणता स्क्रीन गार्ड बेस्ट; 50 रुपयांपासून मिळतात, पण...
18
Mallikarjun Kharge : "जनतेने घेतला मोदींची पाठवणी करण्याचा निर्णय, इंडिया आघाडी 4 जूनला सरकार स्थापन करणार"
19
निखळ सौंदर्यानं अभिनेत्रींना देते मात; सरकारी अधिकारी अन् मोफत उपचार करणारी डॉक्टर
20
१०० वर्षांनी अद्भूत त्रिग्रही योग: ५ राशींना शुभ, धनलाभाची संधी; नोकरीत प्रगती, उत्तम काळ!

कडक सॅल्यूट! खाकीवर्दीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एक डझनहून अधिक लोकांना दिले जीवदान

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2020 12:34 PM

प्राण वाचविल्याचे समाधान त्या पोलिसांच्या चेहऱ्यावर झळकते. त्याच्या नातेवाईकांच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागते.

ठळक मुद्देलॉकडाऊनच्या काळात वेगवेगळ्या कारणामुळे जवळपास २६४ जणांनी आत्महत्यानैराश्येने घेरलेल्या,बेरोजगारी,भांडणे अशा वेगवेगळ्या कारणामुळे आत्महत्येचा विचार करणाऱ्यांना वेळेवर मदत

विवेक भुसे-पुणे : दिवसाची कोणतीही वेळ, पोलीस नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी खणखणतो, एक जण आत्महत्येचा प्रयत्न करीत असल्याची माहिती दिली जाते. ही माहिती तातडीने त्या परिसरातील बीट मार्शल, पोलीस ठाण्याला पोहचविली जाते. बीट मार्शल काही मिनिटात घटनास्थळी पोहचतात, तर ती व्यक्ती गळफास घेत असल्याचे दिसते. पोलीस मागचा पुढचा विचार न करता दरवाजा तोडतात, त्या व्यक्तीला खाली घेतात, त्याचा श्वास चालू असतो, त्याच्यावर प्रथमोपचार करुन त्याचा श्वास पुवर्वत करतात, लगेच रुग्णालयात नेतात, आणखी थोडा उशीर झाला असता तर त्याचे प्राण वाचविता आले नसते, असे डॉक्टर सांगतात, तेव्हा एकाचे प्राण वाचविल्याचे समाधान त्या पोलिसांच्या चेहऱ्यावर झळकते. त्याच्या नातेवाईकांच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागत. गेल्या ६ महिन्यात शहर पोलीस दलातील बीट मार्शल व कर्मचाऱ्यांनी अशा प्रकारे आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या किमान एक डझनहून अधिक लोकांचे प्राण वाचविले आहेत. 

लॉकडाऊनच्या काळात वेगवेगळ्या कारणामुळे जवळपास २६४ जणांनी आत्महत्या केल्या. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा हे प्रमाण कमी आहे. त्याचवेळी पोलिसांनी नैराश्येने घेरलेल्या, बेरोजगारी, भांडणे अशा वेगवेगळ्या कारणामुळे आत्महत्येचा विचार करणाऱ्यांना वेळेवर मदत पोहचून सहकार्य केले. त्यांना समुपदेशन करुन त्यांच्या मनातील आत्महत्येचे विचार दूर केले. 

दत्तवाडी येथील एका सराईत गुन्हेगारालाही पोलिसांनी जीवनदान दिली. कोरोनामुळे पॅरोलवर सुटून घरी आलेला हा गुन्हेगार वडिलांशी भांडण झाल्याने आत्महत्या करीत होता.पोलिसांना हे समजताच ते तातडीने तेथे पोहचले़ खिडकीतून पाहिले तर त्याने गळफास घेतला होता. परंतु, त्याचे हातपाय हलत होते. पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. एकाने त्याचे पाय उचलून धरले़ दुसºया मार्शलने त्याच्या गळ्यातील दोरी सोडून त्याला खाली उतरविले आणि तातडीने रुग्णालयात नेले. 

मुंढवा येथील केशवनगरमध्ये एका ४३ वर्षाच्या व्यक्तीने कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पोलीस तत्परतेने तेथे पोहचून दरवाजा तोडून त्याचा जीव वाचविला. कोंढवा येथेही अशाच प्रकारे एकाने स्वत:ला कोंडून घेऊन आत्महत्या करीत होता. त्याच्या नातेवाईकांनी कळविल्यावर पोलिसांनी त्याला आत्महत्येपासून परावृत्त केले़ वारजेमधील रामनगर येथील ३१ वर्षाचा तरुण वडिलांशी वाद झाल्याने गळफास घेऊन आत्महत्या करीत होता. मृत्युच्या जवळ जाऊन पोहचलेल्या या तरुणाला पोलिसांनी वेळीच जाऊन वाचविले. 

आजाराला कंटाळून एक ज्येष्ठ महिला नदीपात्रात आत्महत्या करायला जात असल्याचे समजल्यावर विश्रामबाग व शिवाजीनगर पोलीस ठाण्यांच्या कर्मचाऱ्यांनी या महिलेचा शोध घेऊन तिला आत्महत्येपासून परावृत्त केले.  

हडपसर येथील एका महिलेने विषारी औषध पिऊन घरात स्वत: ला कोंडून घेतले होते.पोलिसांनी घरात प्रवेश केला. तेव्हा ती महिला बेशुद्ध पडली होती. त्यांनी तिला तातडीने रुग्णालयात नेऊन उपचार केल्याने तिचा प्राण वाचला.

आजाराला कंटाळून एक ६७ वर्षाची महिला जीव देण्यासाठी कॅनॉलवर गेली. परंतु, उडी मारण्याची हिंमत न झाल्याने ती तशीच घसरत पाण्यात गेली. कमरेइतक्या पाण्यात बुडालेल्या या महिलेला पोलिसांनी तातडीने मदत करुन बाहेर काढले. स्पर्धा परिक्षेत यश मिळत नसल्याने लॉकडाऊनच्या काळात नैराश्याने ग्रासलेल्या एका तरुणाने रेल्वेखाली उडी मारुन जीव देत असल्याचा मेसेज मित्राला टाकून घर सोडून निघून गेला. मित्रांनी पोलिसांना हे सांगितल्यावर त्यांनी मोबाईल लोकेशनवर या तरुणाचा शोध घेतला. वाटेतच गाठून त्याचे समुपदेन करुन त्याला आत्महत्येपासून परावृत्त केले.

अंघोळीसाठी गेलेले दोघे जण नदीला पाणी आले असताना बुडत असताना पोलिसांनी त्यांना वाचविले होते. फिरायला जात असताना ६० वर्षांचे गृहस्थ कॅनॉलमध्ये पडले होते.  पोलिसांनी त्यांना बाहेर काढून वाचविले. अशा असंख्य घटना पुणे शहरात गेल्या ६ महिन्यात घडल्या़ पोलिसांनी तातडीने तेथे पोहचून लोकांचा जीव वाचविला आहे.त्याचबरोबर अशा अनेकांना त्यांनी आत्महत्या करण्यापासून समुपदेशनाने दूर केले आहे.़़़़़़़़़़जीवन हे मोलाचे आहे, ते असे वाया जाऊ देऊ नका. आपल्या समस्या सोडविण्यासाठी पोलीस सर्वतोपरी सहकार्य करायला तत्पर आहेत. पुणे पोलिसांनी केलेल्या सर्व्हेमध्ये लॉकडाऊनच्या काळात लोक घरी असल्याने एकत्र कुटुंबामध्ये आत्महत्या करण्याचे प्रमाण कमी असल्याचे दिसून आले.  त्यादृष्टीने कुटुंब महत्वाचे असल्याचे जाणवले आहे. डॉ़ के़ व्यंकटेशम, पोलीस आयुक्त, पुणे़

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिस