शहरं
Join us  
Trending Stories
1
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
2
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
3
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
4
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
5
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
6
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
7
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
8
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
9
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
10
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
11
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
12
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
13
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
14
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
15
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
16
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
17
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
18
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
20
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
Daily Top 2Weekly Top 5

पगार पालिकेचा, काम अधिकाऱ्याच्या घरचे

By admin | Updated: September 8, 2015 04:50 IST

महापालिकेत एके काळी मोठ्या पदावर असलेल्या अधिकाऱ्याची बदली होऊन ३ वर्षे उलटूनही त्या अधिकाऱ्याच्या घरी काम करणाऱ्या महापालिकेच्या कर्मचाऱ्याची मात्र बदली झालेली नाही.

पुणे : महापालिकेत एके काळी मोठ्या पदावर असलेल्या अधिकाऱ्याची बदली होऊन ३ वर्षे उलटूनही त्या अधिकाऱ्याच्या घरी काम करणाऱ्या महापालिकेच्या कर्मचाऱ्याची मात्र बदली झालेली नाही. पगार महापालिकेचा व काम अधिकाऱ्याच्या घरचे, असा हा प्रकार महापालिकेत ३ वर्षांपासून सुरू आहे.महापालिकेच्या उद्यान किंवा स्वच्छता विभागातील कर्मचारी म्हणजे आपल्या दिमतीला ठेवलेले सेवकच आहेत, असे बहुसंख्य वरिष्ठ अधिकारी समजतात. काही वर्षांपूर्वी महापालिकेत अतिरिक्त आयुक्त असलेले नरेश झुरमुरे यांच्याकडेही घरकामासाठी म्हणून उद्यान विभागातील एका महिला कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात आली. कागदोपत्री मात्र या महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती पाषाण येथील संजय निम्हण उद्यानात बिगारी म्हणून दाखविण्यात आली. त्यांची हजेरी वगैरे सर्व सोपस्कार कागदोपत्रीच होतात व महापालिकेचे काम न करताही त्यांचे वेतनही नियमित होते.झुरमुरे यांची सन २०१३मध्ये महापालिकेतून बदली झाली. त्यानंतर या महिला कर्मचाऱ्याला त्यांच्याकडून काढून घेणे आवश्यक होते. मात्र, त्यांची ही सुविधा आहे, तशीच आहे. यशदा या सरकारी प्रशिक्षण संस्थेत नियुक्ती झालेल्या झुरमुरे यांचे बाणेर रस्त्यावर निवासस्थान आहे. संबंधित महिला कर्मचाऱ्याला त्यांच्या या निवासस्थानी आजही घरकामे करावी लागतात. संबंधित महिला कर्मचारी भारतीय जनता पक्षाचे शिवाजीनगर विभागाचे माजी अध्यक्ष सुधीर आल्हाट यांच्या परिचयाच्या आहेत. आल्हाट यांनी याबाबत माहिती अधिकार कायद्यांतर्गत महापालिकेकडे माहिती मागवली. उद्यान विभागाकडून त्यांना याबाबत लेखी उत्तर देण्यात आले. आल्हाट यांनी आता या पत्राचा आधार घेऊन महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे संबंधित महिला कर्मचाऱ्याचा ३ वर्षांचा पगार झुरमुरे व त्यांना ही सुविधा पुरवणाऱ्या महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्याकडून वसूल करावा, अशी मागणी केली आहे. त्याचबरोबर, महापालिकेचे कर्मचारी अशा किती व कोणत्या अधिकाऱ्यांच्या निवासस्थानी कार्यरत आहेत, याची माहितीही त्यांनी मागवली आहे. (प्रतिनिधी)