शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
2
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
3
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
4
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
5
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
6
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
7
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
8
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
9
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
10
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
11
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
12
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
13
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
14
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
15
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
16
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
17
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
18
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
19
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
20
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
Daily Top 2Weekly Top 5

सहजीवन म्हणजे सुंदर नात्यांचा संवाद

By admin | Updated: March 22, 2017 03:26 IST

‘सहजीवन’ हा शब्द खूप फसवा आहे. सध्याच्या काळात या शब्दाचा अर्थ खूप वेगळा आहे. जिथे पती-पत्नी एकमेकांना सन्मानाने

पुणे : ‘सहजीवन’ हा शब्द खूप फसवा आहे. सध्याच्या काळात या शब्दाचा अर्थ खूप वेगळा आहे. जिथे पती-पत्नी एकमेकांना सन्मानाने आणि मित्रत्वाने वागवतात, एकत्रित संसार करूनही परस्परांच्या अस्तित्वावर आक्रमण करीत नाहीत, अशा सुंदर नात्यातून निर्माण होते ते सहजीवन, अशा शब्दांत ज्येष्ठ लेखिका डॉ. अश्विनी धोंगडे यांनी ‘सहजीवना’ची व्याख्या अधोरेखित केली. पूर्वीच्या काळातील आनंदीबाई जोशी, लक्ष्मीबाई टिळक, बाया कर्वे यांच्यासारख्या कर्तृत्ववान महिलांना हे सहजीवन लाभले नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. पुणे नगर वाचन मंदिर संस्थेतर्फे डॉ. नीला पांढरे यांच्या ‘सहजीवनातील प्रकाशवाटा’ या ग्रंथास डॉ. धोंगडे यांच्या हस्ते ‘कै. श्री. ना. बनहट्टी ग्रंथ पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. त्या वेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष प्रा. माधव सोमण, कार्यवाह अरविंद रानडे आणि लेखिका डॉ. नीला पांढरे उपस्थित होत्या. डॉ. नीला पांढरे यांनी पुस्तकामागची भूमिका स्पष्ट केली. ‘सहजीवन’ या संकल्पनेवर माझा विश्वास आहे. यशस्वी महिलेच्या मागे नक्कीच एक पुरुष उभा असतो. या पुस्तकात ११ समाजसुधारकांच्या सहजीवनावर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. रवींद्र घालवलकर यांनी सूत्रसंचालन केले. प्रसाद जोशी यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)