शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

सादिक कपूर प्रकरण; राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 13:05 IST

‘माजी नगरसेवकाने त्याच्याकडे ५० लाख रुपये मागितले होते. नगरसेवक, त्याचा मुलगा, साथीदारांच्या त्रासामुळे वडिलांनी आत्महत्या केली’, अशी फिर्याद सादिक कपूर यांचा मुलगा साजिद याने दिली.

पुणे : हडपसर-सय्यदनगरमधील गुंड टिपू पठाण टोळीविरोधात मकोका कारवाई केल्यानंतर फरार झालेल्या सराईत गुन्हेगाराने लष्कर भागात आत्महत्या केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. त्याने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत (सुसाईड नोट) हडपसरमधील एका माजी नगरसेवकासह अन्य काही जणांची नावे आढळली आहेत. माजी नगरसेवकाने फरार आरोपीकडे ५० लाख रुपये मागितले होते. आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाच्या माजी नगरसेवकासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

सादिक हुसेन कपूर (५६, रा. सय्यदनगर, हडपसर) असे आत्महत्या केलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. याप्रकरणी राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे माजी नगरसेवक फारुक यासीन इनामदार, अफान फारूक इनामदार, जहूर महंमद सय्यद (तिघे रा. सय्यदनगर, हडपसर), तन्वीर इब्राहीम मनियार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. याबबात कपूर यांचा मुलगा साजिद (२७, रा. ख्वाजा मंझील, सय्यदनगर, हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे, अशी माहिती लष्कर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गिरीशकुमार दिघावकर यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सादिक कपूर याचे लष्कर भागातील ईस्ट स्ट्रीट परिसरातील कुमार पॅलेस सोसायटीत कार्यालय आहे. कपूर जमीन खरेदी-विक्री व्यवसाय करायचा. शनिवारी (दि. ३) सायंकाळी त्याने कार्यालयात गळफास लावून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. या घटनेची माहिती मिळताच लष्कर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. त्याला तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती डाॅक्टरांनी दिली.

सादिक कपूर याने आत्महत्या करण्यापूर्वी ३० ते ३५ पानी चिठ्ठी लिहिली होती. पोलिसांनी ही चिठ्ठी जप्त केली. ‘माजी नगरसेवकाने त्याच्याकडे ५० लाख रुपये मागितले होते. नगरसेवक, त्याचा मुलगा, साथीदारांच्या त्रासामुळे वडिलांनी आत्महत्या केली’, अशी फिर्याद सादिक कपूर यांचा मुलगा साजिद याने दिली. त्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. सय्यदनगर परिसरात टिपू पठाण याची दहशत आहे. त्याच्याविरुद्ध वानवडी, हडपसर पोलिस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत. पठाण याच्या टोळीचा सादिक हा सदस्य होता. त्याच्याविरुद्ध ‘मकोका’ कारवाई करण्यात आल्यानंतर तो पसार झाला होता.

English
हिंदी सारांश
Web Title : Ex-corporator booked in Sadik Kapoor suicide case; extortion alleged.

Web Summary : Sadik Kapoor, absconding after MCOCA action, committed suicide, naming ex-corporator Farook Inamdar and others in a note alleging ₹50 lakh extortion. Police have registered a case of abetment to suicide.
टॅग्स :PuneपुणेNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliceपोलिसMunicipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६Crime Newsगुन्हेगारीHadapsarहडपसरPoliticsराजकारण