सद्गुरू शंकर महाराज समाधी ट्रस्टतर्फे ७३ वा समाधी सोहळा रद्द करून १५ लाखांची मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2020 07:18 PM2020-04-17T19:18:56+5:302020-04-17T19:20:59+5:30

मुख्यमंत्री सहाय्यता निधीला १० लाख व ससूनला ५ लाख

Sadhguru Shankar Maharaj Samadhi Ceremony cancelled and help of Rs 15 lakhs funds | सद्गुरू शंकर महाराज समाधी ट्रस्टतर्फे ७३ वा समाधी सोहळा रद्द करून १५ लाखांची मदत

सद्गुरू शंकर महाराज समाधी ट्रस्टतर्फे ७३ वा समाधी सोहळा रद्द करून १५ लाखांची मदत

googlenewsNext
ठळक मुद्देराष्ट्रीय आपत्तीवर मात करण्यासाठी धर्मादाय सह आयुक्त यांच्या आवाहनास प्रतिसाद

पुणे : लाँकडाउन व संचारबंदीमुळे २४ एप्रिल २०२० ते ०२ मे २०२० दरम्यान श्री सद्गुरू संतवर्य योगिराज शंकर महाराज समाधी ट्रस्ट तर्फे ७३ वा समाधी सोहळा व त्या निमित्ताने होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. तरीही मठाच्या परिसरात भक्तांनी गर्दी करु नये, मठ बंद आहे. श्रींचे दर्शन फेसबुक पेजच्या माध्यमातून सर्वांना होईल. मात्र करोना विषाणुचे संसर्गामुळे निर्माण झालेल्या राष्ट्रीय आपत्तीवर मात करण्यासाठी धर्मादाय सह आयुक्त यांच्या आवाहनास प्रतिसाद देत ससून हॉस्पीटल देणगी समितीस आौषधे व साधन सामुग्री करीता रू ५ लाख देण्यात तर मुख्यमंत्री सहायता निधीस रू १० लाख अर्थ साहाय्य करण्यात आले आहे. यावेळी अध्यक्ष भगवान खेडेकर, सचिव सुरेंद्र वाईकर, विश्वस्त प्रताप भोसले, नागराज नायडू उपस्थित होते.

सध्या पुणे शहरात कोरोना विषाणू संसर्ग झाल्यामुळे संचारबंदी लागु केली आहे. अनेक गरीब कुटुंब बेरोजगार आहेत. ट्रस्टच्या सामाजिक बांधिलकीचे उपक्रमा अंतर्गत गरजूंना जेवणासाठी प्रसादरुपी खिचडी मोफत दिली जाते. पुणे म.न.पा. च्या सुचनेनुसार लाँकडाउन काळात अशा गरजु कुटुंबाच्या उदरनिवार्हाकरिता आरोग्य व स्वच्छतेची खबरदारी घेऊन दररोज सकाळ संध्याकाळ मंदिरात बनवललेल्या साधारणपणे २०० ते ३०० किलो तांदळाच्या खिचडीचे वाटप केले जात आहे. त्याचा लाभ पुणे शहर व परिसरातील विद्यार्थी, बेरोजगार मजुर, गरीब कुटुंब अशा २ ते ३ हजार लोकांना मिळत आहे. तसेच  ट्रस्ट तर्फे स्वारगेट ते कात्रज भागात ड्युटीवर असणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना चहा उपलब्ध करून देण्यात येत आहे. हे सर्व काम सद्गुरू सेवा परम धर्म मानून विश्वस्त व भक्तांच्या सहकार्याने होत आहे..

Web Title: Sadhguru Shankar Maharaj Samadhi Ceremony cancelled and help of Rs 15 lakhs funds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.