एका चार्जिंगमध्ये धावते ३०० KM; एसटीच्या मुख्यालयात १० नवीन ई-शिवाई दाखल
By नितीश गोवंडे | Updated: May 11, 2023 17:34 IST2023-05-11T17:33:45+5:302023-05-11T17:34:20+5:30
नवीन आलेल्या बस देखील आरटीओ कार्यालयातील सर्व सोपस्कर पार पडल्यानंतरच एसटीच्या ताफ्यात दाखल होतील

एका चार्जिंगमध्ये धावते ३०० KM; एसटीच्या मुख्यालयात १० नवीन ई-शिवाई दाखल
पुणे: एसटी महामंडळाच्या पुणे येथील मुख्यालयात १० नव्या इलेक्ट्रिक शिवाई बस दाखल झाल्या आहेत. मात्र, या ई-बस अद्याप कोणत्या मार्गावर धावणार, कोणत्या आगारांना दिल्या जाणार, याबाबत निश्चितता नाही. एसटी महामंडळाच्या ताफ्यात दुसऱ्या टप्प्यातील इलेक्ट्रिक शिवाई बस येण्यास सुरुवात झाली आहे. दुसऱ्या टप्प्यातील पहिली बस २४ एप्रिल रोजी दाखल झाली होती. ही बस पुणे - छत्रपती संभाजीनगर मार्गावर धावणार आहे. या बससह आणखी बस आणण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे.
पहिल्या बसची पाहणी पुण्यात गाडी आल्यावर एसटी महामंडळाच्या उप सरव्यवस्थापिका यामिनी जोशी यांनी केली होती. तसेच या नवीन आलेल्या बस देखील आरटीओ कार्यालयातील सर्व सोपस्कर पार पडल्यानंतरच एसटीच्या ताफ्यात दाखल होतील, अशी माहिती वाहतुक अधिकारी कैलास पाटील यांनी दिली. ही बस एका वेळच्या चार्जिंगमध्ये ३०० किलोमीटर धावते.
ई-शिवाईत या सुविधा असणार...
- चालकासमोर अनाउन्समेंट सिस्टीम
- ७ सीसीटीव्ही कॅमेरे
- प्रवाशांचे सामान ठेवायला जागा
- प्रशस्त आसनव्यवस्था
- पॅनिक बटन सुविधा
- फुट लॅम्प
- प्रत्येक आसनाजवळ रीडिंग लाईट्स
- पावरफुल एसी
- प्रवाशांकरिता बसमध्ये टीव्ही
- थांब्यांची माहिती देण्यासाठी इलेक्ट्रिक लाईट्स फलक