Pune: रूबी ते रामवाडी मेट्रो मार्गाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार उद्घाटन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2024 12:35 PM2024-03-04T12:35:11+5:302024-03-04T12:36:12+5:30

याचवेळी पिंपरी-चिंचवड ते निगडी या ४.४ किलोमीटर विस्तारित मेट्रो मार्गाचे भूमिपूजनही होणार आहे...

Ruby to Ramwadi metro line will be inaugurated by Prime Minister Narendra Modi | Pune: रूबी ते रामवाडी मेट्रो मार्गाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार उद्घाटन

Pune: रूबी ते रामवाडी मेट्रो मार्गाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार उद्घाटन

पुणे : रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी या ६ किलोमीटर अंतराच्या मेट्रो मार्गाचे येत्या बुधवारी (दि.६) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन उद्घाटन होणार आहे. याचवेळी पिंपरी-चिंचवड ते निगडी या ४.४ किलोमीटर विस्तारित मेट्रो मार्गाचे भूमिपूजनही होणार आहे.

पंतप्रधान मोदी येत्या बुधवारी एका कार्यक्रमासाठी कलकत्ता येथे असून, त्या कार्यक्रमामध्येच ते पुण्यातील एका मेट्रो मार्गाचे उद्घाटन व पिंपरी-चिंचवडमधील एका मेट्रो मार्गाचे भूमिपूजन करतील, असे पंतप्रधान कार्यालयाने मेट्रो प्रशासनाला कळविले आहे. दरम्यान, या कार्यक्रमांमध्ये ऐनवेळी बदल होण्याची शक्यता असल्याचेही पंतप्रधान कार्यालयाने सांगितले आहे. रुबी ते रामवाडी या मेट्रो मार्गावरील बंडगार्डन, कल्याणीनगर व रामवाडी स्थानकांचे काम पूर्ण झाल्याने ती उद्घाटनानंतर प्रवाशांसाठी खुली होणार आहेत. येरवडा स्थानकाचे काम अद्याप सुरू असल्याने ते काही अवधीने सुरू होणार आहे.

काँग्रेसच्या आंदोलनाचे यश : मोहन जोशी

पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होण्यासाठी रुबी हॉल ते रामवाडी मेट्रो मार्ग सुरू होणे गरजेचे होते; परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सोयीची वेळ मिळत नसल्याने तिथपर्यंत मेट्रो सेवा सुरू होत नव्हती. या विरोधात काँग्रेस पक्ष आणि ‘वेकअप’ पुणेकर यांनी जनमताचा रेटा उभा केला व त्याला यश आले. परिणामी येत्या ६ मार्च रोजी मेट्रो मार्गाचे उद्घाटन होत आहे, असे माजी आमदार व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी पत्रकाद्वारे सांगितले आहे.

Web Title: Ruby to Ramwadi metro line will be inaugurated by Prime Minister Narendra Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.